जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Pune: सराईत गुन्हेगाराच्या हत्येचा बदला, मैत्रिणीने केला तरुणावर जीवघेणा हल्ला

Pune: सराईत गुन्हेगाराच्या हत्येचा बदला, मैत्रिणीने केला तरुणावर जीवघेणा हल्ला

Pune: सराईत गुन्हेगाराच्या हत्येचा बदला, मैत्रिणीने केला तरुणावर जीवघेणा हल्ला

सराईत गुन्हेगार सनी उर्फ गिरीश महेंद्र हिवाळे (वय 24) याच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती. तो 9 एप्रिलला जामिनावर बाहेर आला होता. यानंतर 12 एप्रिलला रात्री 9 वाजेच्या सुमारास तो आणि त्याचे मित्र एका चौकात जमले होते. याचवेळी 15 ते 20 जणांची टोळी तिथे आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 25 मे : बदल्याची भावना (Revenge) ही एक अशी भावना आहे, जी व्यक्तिला स्वस्थ बसू देत नाही. बदल्याच्या भावनेतून अनेक चुकीच्या घटना घडल्याचे तुम्ही वाचले असेल. इतकेच नव्हे तर बदल्याच्या भावनेतून हत्येच्या (Murder) घटना घडल्याचंही तुम्ही वाचले असेल. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना पुण्यात (Pune) घडली आहे. नेमकं काय घडलं  पुण्याच्या काळेपडळ (Kalepadal Pune) इथे खुनाचा बदला घेण्याच्या हेतूने मृताच्या मैत्रिणीने एका स्टॉलधारकावर (Attack on Stall Holder) हल्ला केला. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर खुनाचा प्रयत्न केल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल धनंजय चौगुले (वय 19, रा. काळेपडळ, हडपसर), हृषिकेश उर्फ जंगल्या भारत पांचाळ (वय 20, रा. उरळी देवाची) आणि चैतन्य तुळशीराम कराड (वय 23) या तीन जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर गुन्हा दाखल झालेल्यांपैकी चार जण अल्पवयीन आहेत. मोक्का लावलेल्या आरोपीची हत्या सराईत गुन्हेगार सनी उर्फ गिरीश महेंद्र हिवाळे (वय 24) याच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती. तो 9 एप्रिलला जामिनावर बाहेर आला होता. यानंतर 12 एप्रिलला रात्री 9 वाजेच्या सुमारास तो आणि त्याचे मित्र एका चौकात जमले होते. याचवेळी 15 ते 20 जणांची टोळी तिथे आली. यानंतर या टोळक्याने लाकडी दांडके आणि दगडाने ठेचून सनीचा खून केला होता. हेही वाचा -  वाचून हादरून जाल! युवकाचं पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम; पत्नीनं त्याच मैत्रिणीच्या मदतीनं केलं भयंकर कृत्य

याचाच राग मनात धरून मृत सनी हिवाळे याच्या 17 वर्षांच्या मैत्रिणीने सराईत गुन्हेगार तसेच आपल्या अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने एका स्टॉलधारकारवर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात