जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शाळेत गेले अन् परतलेच नाही; या फोटोमागील कहाणी ऐकून डोळे पाणावतील!

शाळेत गेले अन् परतलेच नाही; या फोटोमागील कहाणी ऐकून डोळे पाणावतील!

शाळेत गेले अन् परतलेच नाही; या फोटोमागील कहाणी ऐकून डोळे पाणावतील!

मुलं शाळेसाठी घराबाहेर पडले मात्र सायंकाळी घराच्या दारात त्यांचा मृतदेह आलेला पाहून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

भोपाळ, 22 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील चार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सकाळी कुटुंबीयांनी मुलांना तयार करून शाळेत पाठवलं. मुलं शाळेसाठी घराबाहेर पडले मात्र सायंकाळी घराच्या दारात त्यांचा मृतदेह आलेला पाहून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. शाळेची बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात चार मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आणि 11 मुलं जबर जखमी झाले आहे. दोन्ही वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. दोघेही जलद गतीने वाहन चालवत होते. हा अपघात इतका मोठा होता की, चार मुलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी शाळेची बस उज्जैन-उन्हेल-नागदा मार्गावरून नागदाच्या फातिमा कॉन्व्हेंट शाळा आणि एगोशदीप विद्यालयाचे 15 विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. यादरम्यान समोरून ट्रकदेखील जलदगतीने येत होता. ट्रकने शाळेच्या बसला जबरदस्त धडक दिली. या अपघातानंतर शाळेच्या बसमधून 15 मुलांना स्थानिकांनी तातडीने बाहेर काढलं. आणि त्यांना रुग्णालयात रवाना करण्यात आलं. यापैकी चार मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य गंभीर मुलांना इंदूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यात शाळेची बस चालवणारा चालकही जखमी झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात