Home /News /crime /

कल्याणमधील धक्कादायक VIDEO; माणसांमुळे द्यावी लागली बैलांना अग्निपरीक्षा

कल्याणमधील धक्कादायक VIDEO; माणसांमुळे द्यावी लागली बैलांना अग्निपरीक्षा

हा व्हिडीओ पाहून प्राणी प्रेमींना संताप व्यक्त केला आहे.

    कल्याण, 6 नोव्हेंबर : कल्याणमधील (kalyan News) एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बैलांना आगीच्या ज्वाळांवरुन उडी मारण्याचा खेळ खेळला जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्राणी प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. कल्याणच्या पूर्वेकडील काटेमानवली चिंचपाडा परिसरात दिवाळीनिमित्ताने (Diwali 2021) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान हृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. हे दृश्य मोबाइल व्हिडीओमध्ये कैद करण्यात आलं आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुकलेल्या गवताला आग लावून त्यावरुन बैलांना उडी मारण्याचा हा खेळ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. (At an event held in Kalyan, the bulls were made to jump out of the fire shocking Video) हे ही वाचा-अ‍ॅटमबॉम्बने घेतला पुण्यातील तरुणाचा जीव; दुर्दैवी घटनेत दिवाळीदिवशीच झाला अंत अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. प्राणी मित्रांकडून यावर कारवाई केल्याची मागणी केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Kalyan, Pet animal

    पुढील बातम्या