जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 2500 कोटींचं ड्रग्ज प्रकरण; मुंबईजवळ अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई

2500 कोटींचं ड्रग्ज प्रकरण; मुंबईजवळ अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई

2500 कोटींचं ड्रग्ज प्रकरण; मुंबईजवळ अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई

कोटयवधी रुपयांच्या ड्रग्ज निर्मितीप्रकरणी ही आठवी अटक आहे. अंबरनाथच्या नमाऊ केमिकल फॅक्टरीमध्येच मुख्य आरोपी प्रेम शंकर सिंग मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची निर्मिती करत असे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 15 सप्टेंबर : 2500 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी सेलने मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने केमिकल कंपनीच्या मालकाला अंबरनाथ येथून अटक केली आहे. अमली पदार्थ बनवण्याचा कट रचल्याप्रकरणी अंबरनाथच्या नमाऊ केमिकल फॅक्टरीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र की बिहार? पोलीस मुख्यालयाच्या गेटवरच पोलीस कर्मचाऱ्याचा खून, यवतमाळ हादरलं कोटयवधी रुपयांच्या ड्रग्ज निर्मितीप्रकरणी ही आठवी अटक आहे. अंबरनाथच्या नमाऊ केमिकल फॅक्टरीमध्येच मुख्य आरोपी प्रेम शंकर सिंग मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची निर्मिती करत असे. याच्या बदल्यात कंपनीच्या मालकाला प्रति किलोच्या आधारे कमिशन मिळत असे. गेल्या महिन्यातच अँटी नार्कोटिक्स सेलने या कंपनीवर छापा टाकून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त केले होते. जिनेंद्र बोरा असं अटक आरोपीचं नाव आहे. यापूर्वी याच कंपनीचा व्यवस्थापक किरण पवार यालाही अँटी नॉरकोटिक्स सेलने अटक केली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक, क्रिप्टो माफियांनी हल्ला केल्याची शक्यता नालासोपारा येथे 1400 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज पकडल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अंबरनाथच्या खासगी नमाऊ केम कंपनीत महिनाभरापूर्वी सर्च ऑपरेशन केलं होतं. ही कंपनी औषध निर्मितीकरिता 14 प्रकारचा कच्चा माल तयार करत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करते. या केमिकल कंपनीतून एमडी ड्रग्स बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा केल्याचा संशय आल्याने ही कारवाई केली गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एका केमिकल कंपनीच्या नावाखाली येथे मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज बनवले जात होते. त्यानंतर येथून ड्रग्ज वाहनातून नालासोपारा ड्रग्ज फॅक्टरीत नेले जात होते. एमडी ड्रग्ज बनवताना दुर्गंधी येत असल्याने या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नंतर ते बनवण्यास नकार दिला होता, त्यानंतर मुख्य आरोपी प्रेम शंकर सिंह याने गुजरातमधील भरूच येथील एका केमिकल कंपनीत उत्पादन हलवले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Drugs
  • First Published :
जाहिरात
जाहिरात