मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बनावट NCB ऑफिसर बनून केलं Blackmail, दबाव सहन न झाल्याने अभिनेत्रीची आत्महत्या

बनावट NCB ऑफिसर बनून केलं Blackmail, दबाव सहन न झाल्याने अभिनेत्रीची आत्महत्या

बोगस अधिकाऱ्यांनी धाड टाकून ब्लॅकमेल केल्यानंतर एका अभिनेत्रीने घाबरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई, 26 डिसेंबर: ड्रग्ज घेतल्याच्या (Drugs consumption) आरोपाखाली पकडण्यात आल्यावर पोलिसांनी मागितलेली खंडणीची (Ransom amount) रक्कम गोळा करणं शक्य नसल्याच्या दबावातून (Pressure) एका अभिनेत्रीनं आत्महत्या (Actress commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली, ते बनावट अधिकारी असल्याचंही तपासात समोर आलं आहे. आपण अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी असल्याचा बनाव रचत दोघांनी एका पार्टीवर धाड टाकत अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या तरुणीला पकडलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची सेटलमेंट करण्याची तयारी दाखवली होती. 

अशी घडली घटना

मुंबईतील जोगेश्वरी भागात भाड्याच्या घरात राहणारी आणि भोजपुरी सिनेमानत काम करणारी एक अभिनेत्री काही दिवसांपूर्वी एका पार्टीला गेली होती. त्यावेळी तिथं अचानक दोन अधिकारी आले आणि त्यांनी धाड घातली. या अभिनेत्रीसह इतर काहीजणांना अंमली पदार्थ घेताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याचं सांगत कारवाई करण्याची तंबी दिली. 

तरुणीने मागितली सेटलमेंट

या कारवाईमुळे आपलं करिअर बरबाद होईल, असं वाटल्यामुळे तरुणींनी पोलिसांसोबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला. बनावट पोलीसही याच संधीची वाट पाहत होते. त्यांनी थोडे आढेवेढे घेत अंतिमतः सेटलमेंटची तयारी दाखवली. सुरुवातीला 40 लाखात सेटलमेंटची मागणी त्यांनी केली. घासाघीस केल्यानंतर ही रक्कम 20 लाख निश्चित करण्यात आली. 

तरुणीला आलं टेन्शन

मध्यमवर्गीय कुटुंबातील या तरुणीला एवढी मोठी रक्कम कशी जमा करावी, याचं टेन्शन आल्यामुळे त्या दबावाखालीच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून घेतला आहे. 

हे वाचा- भल्या पहाटे नदीकाठी नेत बापानेच 13 वर्षीय मुलाचा घोटला गळा, धक्कादायक कारण समोर

दोघांना अटक 

या प्रकरणी सूरज परदेशी (32) आणि प्रवीण वाळिंबे (28) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Actress, Crime, Police, Sucide