मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेऊन 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; त्या अवस्थेत पीडितेचे काढले फोटो

घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेऊन 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; त्या अवस्थेत पीडितेचे काढले फोटो

सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

बीड जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीवर तीन नराधम तरुणांकडून सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड, 19 डिसेंबर : पालघरमध्ये अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आई-वडील कामाला गेल्याची संधी साधत, घरातून फरफटत ओढत नेत, शेजारील उसाच्या शेतामध्ये नेऊन, 3 नराधम तरुणांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. तर यावेळी एका महिलेने, तिचे नग्न अवस्थेतील फोटोही काढले आहेत. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, मंठा तालुक्यातील एक कुटुंब दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील शेतकऱ्याच्या शेतावर कामाला आहे. शुक्रवारी सकाळी आईवडील शेतात कामाला गेल्याने, त्यांची 17 वर्षीय पीडित मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधत आरोपी बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळने पीडित मुलीला शेजारील उसाच्या फडात फरफटत ओढत नेले. तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला.

वाचा - 'फोन केला तर ती फक्त रडत होती', 8 मित्रांचे सैतानी कृत्य, पालघर हादरलं

तर या दरम्यान एका महिलेने सामूहिक अत्याचार होत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले. या घटनेमुळे दिंद्रुड परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या फिर्यादीवरून, दिंद्रुड पोलीस ठाण्यात एका महिलेसह महादेव सुधाकर फपाळ, विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ आणि अक्षय अर्जुन फपाळ यांच्यावर बाललैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नराधम आरोपी फरार होण्यापूर्वी सापळा रचत पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्यासह टीमने, विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ व अक्षय अर्जुन फपाळ या तीन नराधमांना तात्काळ जेरबंद केले आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच पोटच्या मुलीवर नराधम बापाने बलात्कार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा या सामूहिक बलात्काराच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. एकीकडे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असलो तरी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात महिला आणि मुली असुरक्षित असल्याचा चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळं अशा काळीमा फासणाऱ्या घटना बंद होण्यासाठी, पोलीस प्रशासन आणि सरकारने आता गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.

First published:
top videos

    Tags: Beed, Crime