'पॉर्न व्हिडिओ पाहिला म्हणून अलर्ट, पुन्हा पाहिला तर कारवाई होईल'; पोलिसांचा मेसेज होतोय व्हायरल

'पॉर्न व्हिडिओ पाहिला म्हणून अलर्ट, पुन्हा पाहिला तर कारवाई होईल'; पोलिसांचा मेसेज होतोय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर पोलिसांना केलेला हा मेसेज व्हायरल होत आहे.

  • Share this:

लखनऊ, 24 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार इंटरनेटवर अश्लील पॉर्न व्हिडिओ पाहण्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांनंतर खरंच अशी घटना घडल्याचा एका मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील हेल्पलाइन क्रमांक 1090 च्या नावाने व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळे मंगळवारी गोंधळ उडाला. या एसएमएसमध्ये लिहिलं होतं की, 'इंटरनेट युजर.. उत्तर प्रदेश पोलीस 1090 तुम्हाला अश्लील पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या गुन्ह्याखाली पूर्व सूचना देत आहे. पुढील वेळेस अश्लील व्हिडिओ पाहण्यासाठी सूचना नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल'.

हा मेसेज व्हायरल होताच सोशल मीडियावर गोपनीयतेच्या अधिकाराबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावरुन लोकांनी उत्तर प्रदेश पोलिसांना खूप ट्रोल केलं आहे. हेल्पलाइन क्रमांक 1090 यांनी 12 फेब्रुवारी रोजी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर हा वाद सुरू झाला. यादरम्यान मीडियाला सांगण्यात आलं की, इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ पाहू नये यासाठी लोकांना जागरुक करण्यात येईल. अशा साइटवर जाणाऱ्यांना एक सूचना देणारा मेसेज जाईल. यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानुसर जर पॉर्न व्हिडिओ वा साइटवर जाणं बेकायदेशीर नसेल तर सूचना व अलर्ट कशाबद्दल?

हे ही वाचा-बायकोच्या कटकटीपासून वाचण्याची ट्रिक; हर्ष गोयंका यांनी शेअर केला VIDEO

काहींनी तयार केले मीम्स

यानंतर 15 फेब्रुवारी रोजी 1090 या हेल्पलाइन क्रमांकाडून ट्वीट करुन स्पष्ट करण्यात आलं की, साइकोग्राफिक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन चाइल्ड पॉर्नोग्राफी संबंधित इंटरनेटवर उपलब्ध साहित्य सर्च करणाऱ्यांना पॉपअप मेसेजच्या माध्यमातून अलर्ट करण्यात येईल. काही जणांनी या माहितीच्या आधारावर फेक मेसेज व्हायरल केला.यावर एडीजी नीरा रावत यांनी सांगितलं की, हा मेसेज फेक असून याचा तपास केला जाईल.

Published by: Meenal Gangurde
First published: February 24, 2021, 4:52 PM IST

ताज्या बातम्या