चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 26 मे : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लव जिहाद हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पुणे जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली असल्याचा दावा भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केला आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये एका मुस्लिम युवकाने अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन चार वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबांची भेट घेत पोलिसांना याप्रकरणी गंभीर कारवाई करण्याच्या सूचना केल्यात तर पोलिसांनी सुद्धा आरोपीला अटक केली आहे. परिणामी हे प्रकरण तापणार असल्याची शक्यता आहे. पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील यावरुन लक्ष्य केलं आहे. आमदार गोपिचंद पडळकर काय म्हणाले? पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आमदार गोपिचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. पडळकर म्हणाले, पुणे जिल्ह्यातील मंचरमध्येही लव जिहादची केस समोर आली. चार वर्षांपूर्वी या मुलीला पळवून नेलं होतं. पोलिसात तक्रारही दिली पण पोलिसांनी काहीच केलं नाही. अखेर द केरला स्टोरी सिनेमा आल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी या मुलीचा पुन्हा शोध घेतला आणि पुन्हा नव्याने गुन्हा दाखल केला. या मुलीला घरातच डांबून ठेवल्याने ती प्रचंड मानसिक दबावाखाली आहे. पीडितेला सिगारेटचे चटके दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुप्रिया ताई म्हणतात लव जिहाद मला माहित नाही. माझी त्यांना विनंती त्यांनी या पीडित मुलीची व्यथा जाणून घ्यावी, असं आवाहन पडळकर यांनी सुळे यांना केलं. संबंधित मुलगी मंचरमध्ये मिळून आली. तिला खोलीत बंद करून ठेवलं होतं. त्या मुलीला समजून सांगून घरी घेऊन आले. बुरखा घालून मुलगी त्याच्या घरी होती. मुलीच्या अंगावर सिगारेटचे चटके दिले होते. गैरप्रकार करायला लावत होते. या मुलीला गोळ्या दिल्या जात होत्या. प्रिस्क्रिप्शन सापडले आहेत. तिची मानसिकता आता बोलण्याची नाही, ती घाबरली आहे. त्या मुलाच्या नातेवाईकांना आणि त्याला अटक झाली पाहिजे. बोगस कागदपत्रे काढली आहेत. त्यावर कारवाई झाली पाहीजे. पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे. मुलीवर मानसोपचार तज्ञांकडून उपचार करण्याची मागणी पडळकर यांनी केली. वाचा - भंडाऱ्यात दृश्यमसारखी घटना, 4 वर्षांनंतर मारेकरी सापडले; पण तरुणीचा मृतदेह अजूनही गायब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गृहमंत्री याच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. पळवून घेऊन गेला तेव्हा तो बाहेर गेला होता. तो महाराष्ट्रात नव्हता, सहा महिने हेलपाटे घातले. चार वर्षांपासून ही मुलगी बेपत्ता होती. दहावीचा पेपर झाला तेव्हापासून बेपत्ता होती. कमी वय होतं, तेव्हा कमी वय असल्याने कळत नाही. मेडिकल रिपोर्टमध्ये गंभीर गोष्टी समोर आल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.
पीडित मुलीचा भाऊ म्हणतो.. जावेद शेख असं आरोपीचं नाव असून त्याने फुस लावून पळवून घेऊन गेला आहे, असं पोलिसांना सागितले. पोलीस तपास ढिला झाला, फक्त तपास सुरू आहे, असं सागितले जात होतं. पोरगा बेपत्ता होता तरी त्यांनी काही दखल केल नाही. तीन महिने कालावधी झाल्यावर आम्ही सांगत होतो. नेते मंडळींना भेटायला जायचं म्हटलं की पोलीस तपास सुरू आहे. त्याचं कुटुंब इथलच आहे, आई इथली आणि वडील यूपीमधील आहेत. आमचा आरोप आहे जे कोणी यात सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. 16 मे ला आम्हाला सापडली. मला स्वतःला वाटत कि हा लव जिहाद प्रकार आहे. स्थानिक नेत्यांना भेटलो पण त्यावेळी गृहमंत्री असणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांना भेटलो नाही, अशी माहिती पीडितेच्या भावाने दिली आहे.