मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लग्नाचं आमिष दाखवून मामाच्या मुलीचीच केली भयावह अवस्था; शेतातच आढळला मृतदेह

लग्नाचं आमिष दाखवून मामाच्या मुलीचीच केली भयावह अवस्था; शेतातच आढळला मृतदेह

एका तरुणीच्या ब्लाइंड मर्डरचा (Murder) गुरुवारी पोलिसांनी खुलासा केला.

एका तरुणीच्या ब्लाइंड मर्डरचा (Murder) गुरुवारी पोलिसांनी खुलासा केला.

एका तरुणीच्या ब्लाइंड मर्डरचा (Murder) गुरुवारी पोलिसांनी खुलासा केला.

जयपूर, 24 डिसेंबर : जयपुर शहरातील (Jaipur News) तुंगा भागात एका तरुणीच्या ब्लाइंड मर्डरचा (Murder) गुरुवारी पोलिसांनी खुलासा केला. ही घटना तरुणीच्या मामेभावानेच केल्याचं समोर (Crime News) आलं आहे. डीसीपी प्रल्हाद कृष्णीया यांनी सांगितलं की, अटकेत असलेल्या आरोपीचं नाव विक्रम मीणा (23) आहे. तो तूंगा भागातील राहणारा आहे. त्याचं आपल्या आतेबहिणीसोबत अफेअर सुरू होतं.

त्याचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. प्रेम प्रकरणात जवळीक असल्या कारणाने ती विक्रमवर लग्नासाठी दबाव टाकत होती. तेव्हाच त्याने विक्रमच्या बहिणीच्या हत्येचा कट रचला. 21 डिसेंबर रोजी विक्रमने आपल्या आते बहिणीला लग्न करण्याबद्दल सांगून बोलावून घेतलं. यानंतर तो आपल्या मित्राच्या बाइकवर बसून तिला गावी घेऊन आला. येथे रात्री उशिरा विक्रमने तरुणीचा गळा आवळला. यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर त्याने तिच्याकडील दागिने चोरले आणि खेचत मृतदेह शेतात घेऊन गेला. येथे खड्डा खोदून तिचा मृतदेह पूरला.

हे ही वाचा-रात्री एकत्र झोपले होते काका-पुतण्या, सकाळी खोलीत आढळले मृताव्यस्थेत

दुसऱ्या दिवशी मुलगी गायब असल्याचं कळताच तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे विक्रमच्या शेतात गावकऱ्यांना एक मृतदेह दिसला. यानंतर पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली. पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर 48 तासांच्या आत विक्रमला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे.

First published:

Tags: Crime news, Jaipur, Murder