मुजफ्फरनगर, 04 एप्रिल: 25 वर्षांपूर्वी केलेल्या गंभीर गुन्ह्यातील दोषीच्या नुकत्याच मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्तीने 1995 साली एका युवतीचं अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार (Kidnapping and rape Case) केला होता. न्यायालयात दोष सिद्ध झाल्यानंतर शिक्षा सुनावण्याच्या एक दिवस आधी आरोपीने पळ काढला होता. गेल्या 25 वर्षांपासून फरार असलेल्या संबंधित दोषीचा पोलीस सातत्याने शोध घेत होते. पण त्याने पोलिसांना प्रत्येक वेळी गुंगारा दिला होता. शनिवारी पोलिसांनी दोषी व्यक्तीला अटक (Convict arrest After 25 years) केली असून पुढील कारवाई केली जात आहे.
संबंधित आरोपीचं नाव शाहिद हसन असून त्याने व त्याच्या काही साथीदाराने 1995 साली उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील एका युवतीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार होता. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, 25 वर्षांपूर्वी एका बलात्कार प्रकरणी संबंधित व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलं होतं. न्यायालयाने शिक्षा सुनावण्याच्या एक दिवस आधी शाहिद हसन बेपत्ता झाला होता. याप्रकरणात न्यायालयाने शाहिद हसनच्या साथीदारांना प्रत्येकी दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण तो पळून गेला होता.
कायद्याच्या तरतुदीनुसार, एखाद्या आरोपीचा सात वर्षांपर्यंत काहीही सुगावा लागला नाही. तर अशा व्यक्तीला मृत घोषित करण्यात येतं आणि संबंधित गुन्ह्याची फाइल बंद करण्यात येते. मात्र 25 वर्षांपूर्वी न्यायालयाने संबंधित व्यक्तीला दोषी ठरवलं होतं. त्यामुळे त्याला हा कायदा लागू होतं नाही.
हे ही वाचा - पत्नीसोबत झालेल्या वादाचा बदला म्हणून मेव्हुण्याच्या गर्भवती पत्नीवर बलात्कार
या तरतुदीबाबत विचारलं असता, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, त्या व्यक्तीला कोर्टानं दोषी ठरवलं आहे. कोर्टानं त्याला गुन्हेगार घोषित केल्यानंतर त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात त्याच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीने सदर व्यक्तीला मृत घोषित करण्यासाठी कोर्टात धाव घेतली नव्हती. त्यामुळे या प्रकरणात संबंधित तरतूद लागू होत नाही, असंही पोलीस अधिकाऱ्यानी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gang Rape, Uttar pradesh