जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Shraddha Walker Murder : श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबकडून झाली एक चूक, 'असा' सापडला पोलिसांच्या जाळ्यात!

Shraddha Walker Murder : श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबकडून झाली एक चूक, 'असा' सापडला पोलिसांच्या जाळ्यात!

Shraddha Walker Murder : श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबकडून झाली एक चूक, 'असा' सापडला पोलिसांच्या जाळ्यात!

दिल्लीमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने आपल्याच प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. मात्र एक चूक भोवली अन् पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली :  दिल्लीमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने आपल्याच प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. तो गेल्या सहा महिन्यांपासून हे मृतदेहाचे तुकडे फेकत होता. आफताब अमीन पूनावाला असं या हत्याकांडातील आरोपीचं नाव आहे. तर श्रद्धा असं त्याच्या प्रेयसीचं नाव होतं. अखेर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी आफताब याच्या मुसख्या आवळल्या असून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. असा पकडा आरोपी   आफताब अमीन पूनावाला सुरुवातीपासूनच मुंबई आणि दिल्ली या दोन राज्यांच्या पोलिसांना चकमा देत होता. आफताबने दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांना सांगितले होते की, 22 मे रोजी भांडण झाल्यानंतर श्रद्धा घरातून निघून गेली होती. आफताबने असेही सांगितले होते की तिने कपडे आणि इतर सामान येथे सोडताना फक्त तिचा फोन घेतला होता. पण, पोलिसांनी आफताबच्या वक्तव्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही, आफताब आणि श्रद्धाचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले असता अनेक धक्कादायक खुलासे झाले. इथेच अफताब वरील पोलिसांचा संशय बळावला. हेही वाचा :        Shraddha murder case Update : श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये अन् आफताब दुसऱ्याच मुलीसोबत राहत होता घरात एक चूक अन् बेड्या   तपासात पोलिसांना कळले की 26 मे रोजी श्रद्धाच्या नेट बँकिंग ऍप्लिकेशनवरून आफताबच्या खात्यात 54 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते, तर आफताबने पोलिसांना सांगितले होते की, 22 मे पासून तो श्रद्धाच्या संपर्कात नव्हता. ही आफताबची चूक पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही, आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. हेही वाचा :   Shraddha murder case Update : आफताबचं महाराष्ट्र कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर कॉलसेंटरमध्ये ओळख   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब आणि या तरुणीची ओळख मुंबईतील एका कॉलसेंटरमध्ये झाली होती. सुरुवातील त्यांच्यामध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांनी याबाबत त्यांच्या घरच्यांना माहिती दिली. मात्र घरच्यांचा विरोध असल्यामुळे ते दोघे दिल्लीला पळून गेले. या दरम्यान श्रद्धाचे कुटुंबीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या संपर्कात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिचा अचानक संपर्क तुटल्याने तिच्या घरच्यांना संशय आला. त्यानंतर देशाला हदरवणारी ही घटना समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात