अशोक शर्मा, प्रतिनिधी
श्रीगंगानगर, 17 मार्च : देशात दिवसेंदिस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. हत्या, आत्महत्या तसेच आर्थिक फसवणुकीसह चोरीच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पहाटे साडेचारच्या सुमारास श्रीगंगानगर येथील अनुपगड पोलीस स्टेशन हद्दीतील 87 जीबी येथील पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून दरोडा टाकला. पहाटेच्या सुमारास आलेल्या या दोन्ही चोरट्यांनी आधी कारमध्ये पेट्रोल टाकले आणि नंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या सेल्समनला मारहाण केली. तसेच त्याच्याजवळील 10 ते 15 हजार रुपयांची रोकडही पिस्तुलाच्या धाकावर हिसकावून तेथून पळ काढला. तर पळून जाताना हल्लेखोरांनी गोळीबारही केल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अनुपगड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि पीडित सेल्समनकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. यासोबतच सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास घडलेल्या या लुटीच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
पोपटाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्याची मागणी, नेमका काय आहे हे प्रकरण?
सकाळची वेळ असल्याने पेट्रोल पंपाच्या सेल्समनकडे जास्त रोकड नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, सेल्समनकडे फक्त 10 ते 15 हजार रुपये रोख होते. दरोड्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी आधी बाईकमध्ये पेट्रोल टाकले आणि नंतर पेट्रोल पंपाच्या सेल्समनवर प्राणघातक हल्ला करून त्याच्याकडील रोख रक्कम हिसकावून घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. एवढेच नाही तर पळून जाताना चोरट्यांनी गोळीबारही केला. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gun firing, Local18, Rajasthan