अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी कानपूर, 17 मार्च : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचारांमुळे माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण कानपूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. चुकीचे उपचार देऊन पोपटाचा मृत्यू झाल्याचा आरोप कानपूरमधील एका कुटुंबाने पशुवैद्यकीय डॉक्टरांवर केला आहे. इतकेच नाही तर नातेवाइकांनी पोपटाचा मृतदेह घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी पोपटाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात तक्रार दिली आहे. ही घटना कानपूर महानगरातील हनुमंत बिहार पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीत घडली. याठिकाणी डॉ. अश्विनी कुमार यांचे हेल्दी पॉ नावाने पशुवैद्यकीय दवाखाना आहे. जुही येथील रहिवासी शमशाद अहमद यांनी सांगितले की, ते डॉ. अश्विनी यांच्याकडे पोपटावर उपचार करण्यासाठी गेले होते. जिथे त्यांनी त्याला चुकीचे औषध दिले आणि 1 तास ब्लोअरसमोर ठेवले. त्यामुळे त्याच्या पोपटाचा मृत्यू झाला.
अमानुषपणाचा कळस! मुका जीव तडफडत होता, जीव जाईपर्यंत चौघांनी श्वानाला…; संतापजनक कृत्याचा VIDEO यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचवेळी डॉ. अश्विनी कुमार सिंह यांनी सांगितले की, 12 मार्चला त्यांच्याकडे पोपट दाखवायला आले होते. त्यांनी औषध दिले. यानंतर तो इथून तो तसाच गेला होता. तसेच दोन-तीन दिवस पाठपुरावा करण्यासाठी कोणीही आले नाही. मात्र, यानंतर पोपटाच्या मृत्यूची घटना समोर आली. एखादा गुन्हा घडला की वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस हद्दीचा वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार यातही पाहायला मिळाला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यामध्ये जो कुणी दोषी आढळेल, त्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.