बरेली, 22 जानेवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) बरेली येथून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील भोजीपुरा भागात बुधवारी रात्री 52 वर्षाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या व्यक्तीने 10 हून अधिक लग्न केली होती. या व्यक्तीची हत्या अज्ञातांनी केल्याचं समोर आलं आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
जगनलाल यादव नावाच्या एका शेतकऱ्याला कोटी रुपयांची वडिलोपार्जित संपती मिळाली होती. हा व्यक्ती ही संपत्ती आपल्या सोबत राहणाऱ्या एका 24 वर्षीय व्यक्तीच्या नावावर ही संपत्ती ट्रान्सफर करणार होता. हा तरुण जगनलाल यांचा दत्तक पूत्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगनलाल यांच्या निर्णयामुळे त्यांचे मोठे भाऊ नाराज होते. जगनलाल याने पहिलं लग्न 90 दशकाच्या सुरुवातीला केलं होतं. त्यांच्या 5 पत्नींचं कथित आजारांतून मृत्यू झाला होता. (after 10 marriage No child The farmer was finally found dead ) पाच पत्नींच्या मृत्यू व्यक्तीरिक्त तीन पत्नींनी त्याला सोडून दिलं आणि दुसऱ्या पुरुषांसोबत राहू लागली. सध्या त्याच्या दोन पत्नी आहेत, ज्या पश्चिम बंगालच्या आहेत. दोघांचे वय 35 आणि 40 वर्ष आहे.
गळ्याभोवती मफलर आवळलं
पोलिसांनी सांगितलं की, दोन्ही पत्नींचा दावा आहे की, त्यांना जगनलाल हा विवाहित असल्याची माहिती नव्हती. जगनलाल यांचा मृतदेह शेतात सापडला होता. गळ्यातील मफलरीने त्यांचा गळा आवळण्यात आला होता. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की, ही हत्या संपत्तीच्या कारणामुळे झाली असावी. आधी त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आला होता, त्यानंतर मफलरने त्यांचा गळा आवळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला शंका आहे की, जगन यांची हत्या संपत्तीच्या कारणामुळे झाली असावी. ही संपत्ती मुख्य रस्त्याच्या शेजारी आहे आणि याची बाजारात किंमत कोटी रुपयांमध्ये आहे. स्थानिकांनी सांगितलं की, तो वारंवार लग्न करीत होता. मात्र त्याला एकही मुल झालं नाही. (after 10 marriage No child The farmer was finally found dead ) त्यानंतर एक तरुण त्याच्यासोबत राहू लागला. हा तरुण त्याच्या पहिल्या पत्नीच्या पहिल्या पतीपासून जन्माला आलेला होता.
हे ही वाचा-धक्कादायक! सॅनिटायजरचा वापर करत असाल तर सावधान! लहान मुलांना येऊ शकतं अंधत्व
पोलिसांना तपासादरम्यान माहिती मिळाली की, जगमलाल यांच्या वडिलांनी त्यांना अनेकदा लग्नानंतर आपल्या संपत्तीतून बेदखल केलं होतं आणि मोठ्या भावाच्या नावावर संपूर्ण 70 बिघा जमिनीची मागली मोठ्या भावाच्या नावावर हस्तांतरित केली होती. त्यानंतर त्यांच्या मोठ्या भावाने 1999 मध्ये कौटुंबिक वाद मिटवला. आणि पंचायतीने दिलेल्या आदेशानुसार 14 बिघा जमिन जगनलाल यांच्या नावावर हस्तांतरिक केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Murder, Uttar pradesh