Home /News /crime /

आधी कोविड..नंतर डिप्रेशन; वकील रात्री घराबाहेर पडले आणि परतलेच नाही, नागपूरातील धक्कादायक घटना

आधी कोविड..नंतर डिप्रेशन; वकील रात्री घराबाहेर पडले आणि परतलेच नाही, नागपूरातील धक्कादायक घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अॅड. प्रवीण तपासे हे चंदननगर येथील रहिवासी होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची तब्येत काहीवेळा खराब झाली होती. यानंतर ते मानसिक तणावात (Advocate in Depression) होते.

  नागपूर, 27 मे : नैराश्यात येऊन अनेक महिला पुरुषांनी आत्महत्येसारखे (Suicide in Depression) टोकाचे पाऊल उचलल्याचे तुम्ही वाचलं असले. दिवसेंदिवस या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यात आता क्राईम सिटी नागपुरमधून (Crime City Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना नागपुर शहरातील अंबाझरी परिसरात (Ambazari) घडली. काय आहे घटना - नागपूर शहरातील एका वकिलाने आत्महत्या (Advocate Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन या वकिलाने आत्महत्या केली. अॅड. प्रवीण तपासे असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. यानंतर गुरुवारी ही घटना समोर आली. या घटनेनंतर नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही. तपासे हे सिव्हील मॅटर्सची काम पाहायचे. अॅड. तपासे हे चंदननगर येथील रहिवासी होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची तब्येत काहीवेळा खराब झाली होती. यानंतर ते मानसिक तणावात (Advocate in Depression) होते. अॅड. तपासे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नाही. त्यामुळे पोलीस वेगवेगळ्या शक्यतांच्या आधारावर तपास करीत आहेत. हेही वाचा - पुन्हा दलिताच्या वरातीत गोंधळ, 40 जणांकडून दगडफेक आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला; 4 जण जखमी
  कागदपत्रांच्या आधारवर ओळख पटली - 
  ॲड. तपासे यांनी बुधवारी रात्री अंबाझरी तलावात उडी घेतली होती. यानंतर त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर अग्निशमन विभागाच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तसेच त्यांच्या खिशात असलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती कळविण्यात आली. तपासे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात पोलीस आणखी तपास करीत आहेत. मानसिक तणावात असलेल्या वकिलाने तलावात उडी घेत संपविले जीवन; नागपुरातील धक्कादायक घटना
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Depression, Nagpur News, Person suicide

  पुढील बातम्या