गुजरात, 27 मे: अहमदाबादमध्ये (Ahmedabad) सवर्ण (ठाकोर) समुदायाच्या अनेक सदस्यांनी गुरुवारी दलितांच्या (Dalit) वरातीवर हल्ला केला. ज्यात चार जण (four people were injured) जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी वधू (bride) तारा जगदीश परमार हिचा विवाह राहुल हरेश परमार याच्याशी होणार होता. वरात गावाच्या सीमेवर पोहोचली तेव्हा वधूच्या कुटुंबातील इतर सदस्य वराचे आणि त्याच्या कुटुंबाचे स्वागत करण्यासाठी पोहोचले. वधूच्या वडिलांचा आरोप वधूचे वडील जगदीश परमार यांनी आरोप केला की, वरात ठाकोरवास परिसराजवळ येताच काठ्या आणि इतर शस्त्रांनी सज्ज सुमारे 40 जणांनी वरातीवर दगडफेक करून हल्ला केला. जगदीश म्हणाले की, गावाने घोड्यांवर वरातीवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला होता, त्यामुळे त्यांची मुलगी आणि कुटुंबातील सदस्य डीजेच्या गाण्यावर चालत येत होते, तरीही ठाकोर समुदायाच्या सदस्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलीस काय म्हणाले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच डेट्रोज आणि नजीकच्या पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अहमदाबाद ग्रामीण पोलीस उपअधीक्षक एनडी चौहान म्हणाले, तारा आणि राहुलचे लग्न पोलीस संरक्षणात पार पडले आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला शिक्षा, शाळेच्या मुख्याध्यापक ढसाढसा रडला कोर्टात चौहान म्हणाले की, लग्न झाल्यानंतरच वधूच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधितांना अटक केली जाईल. तक्रार दाखल केली जाईल राज्य पोलीस नियंत्रण कक्षाने एका निवेदनात म्हटलं आहे की, ठाकोर समाजातील सदस्य आणि दलित कुटुंबामध्ये डीजे वाजवण्यावरून वाद झाला, ज्यामुळे हाणामारी झाली. ज्यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले. मात्र तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.