जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / अखेर बिंग फुटलं, आठ जणांची हत्या करुन आश्रमात राहणाऱ्या भोंदू बाबाला अटक!

अखेर बिंग फुटलं, आठ जणांची हत्या करुन आश्रमात राहणाऱ्या भोंदू बाबाला अटक!

अखेर बिंग फुटलं, आठ जणांची हत्या करुन आश्रमात राहणाऱ्या भोंदू बाबाला अटक!

एखादा चोर आपली सर्व गुन्हेगारी कृत्य करुन पसार होतो. त्यानंतर दुसऱ्याच राज्यात तो एकदम ‘धर्मात्मा’ बनतो. पण अखेर ‘त्याचे बिंग फुटते आणि त्या खूनी बाबाला अटक होते. एखाद्या सिनेमात अगदी फिट्ट बसेल अशी कथा प्रत्यक्षात घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अमरेली (गुजरात) 11 फेब्रुवारी : एखादा चोर आपली सर्व गुन्हेगारी कृत्य करुन पसार होतो. त्यानंतर दुसऱ्याच राज्यात तो एकदम ‘धर्मात्मा’ बनतो. तिथं साधू बनलेल्या या बाबाचा भलताच थाट असतो. त्याचा भक्त संप्रदाय वाढतो. अनेक बडी मंडळी देखील त्या बाबाच्या दरबारात हजेरी लावतात. पण अखेर ‘कानून के हाथ लंबे होते है’  या म्हणीप्रमाणे त्याचे बिंग फुटते आणि त्या खूनी बाबाला अटक होते. एखाद्या सिनेमात अगदी फिट्ट बसेल अशी कथा प्रत्यक्षात घडली आहे. हरयाणातील (Haryana) माजी आमदारासह (Former MLA) आठ जणांची हत्या करणाऱ्या मोस्ट वाँटेड (most wanted) गुन्हेगाराला गुजरातमधील अमरेलीमध्ये (Amreli) अटक करण्यात आली आहे. संजीव कुमार असं या भोंदू बाबाचं नाव आहे. कुमारनं त्याची बायको सोनियाच्या मदतीनं सासरे आणि माजी आमदार रेलू राम पुनिया यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ जणांची 2001 साली हत्या केली होती. या प्रकरणात त्याला सुरुवातीला फाशीची शिक्षा झाली होती. त्यानंतर 2004 साली या फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आलं होतं.  कुमारची 2018 साली पॅरोलवर (Parole) सुटका झाली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. फरार झाल्यानंतर आश्रमाचा आश्रय कुमारनं जेलमधून फरार झाल्यानंतर गुजरातमधील राजूला तालुक्यात असलेल्या आनंदयोग आश्रमाचा आश्रय घेतला होता. या आश्रमात कुमारनं ‘आनंदगिरी महाराज’ हे नाव धारण केलं होतं. तेथील भाविक संत समजून त्याची देखील पूजा करत असत. राजूला तालुक्यातील स्थानिक संत खांडेश्वरी बापू यांच्या नावाचा हा आश्रम आहे. या बापूंच्या निधनानंतरही त्यांचा भक्त संप्रदाय कमी झालेला नाही. सुमारे 20 वर्ष जुन्या या आश्रमात भक्तांची मोठी गर्दी असते. भक्तांच्या याच गर्दीचा आपल्याला फायदा मिळेल अशी कुमारची समजूत होती.

(वाचा -  येरवडा जेलबाहेर रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी, गुंडाचा वाढदिवस केला साजरा )

null

कुमार दरवर्षी आश्रमात कृषी संमेलन भरवत असे. मागील वर्षी झालेल्या कृषी संमेलनात त्यानं चक्क गुजरातच्या राज्यपालांना देखील निमंत्रण दिलं होतं. कुमार गुजरातमध्ये लपून बसल्याचा संशय हरयाणा पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांचा गुजरातमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये तपास सुरू होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात