Home /News /crime /

समाधी घ्यायला महिला उतरली गंगेत, भक्तांनी सुरु केलं भजन, पोलिसांची धावपळ

समाधी घ्यायला महिला उतरली गंगेत, भक्तांनी सुरु केलं भजन, पोलिसांची धावपळ

आपल्याला गंगा नदीचं (River Ganga) बोलावणं आलं असून 24 तासांच्या जलसमाधीसाठी (Water submerge) आपण जात असल्याचं सांगून एक महिला (woman) गंगा नदीच्या पात्रात उतरली.

    रांची, 7 सप्टेंबर : आपल्याला गंगा नदीचं (River Ganga) बोलावणं आलं असून 24 तासांच्या जलसमाधीसाठी (Water submerge) आपण जात असल्याचं सांगून एक महिला (woman) गंगा नदीच्या पात्रात उतरली. महिला समाधीसाठी जात असल्याचं समजल्यावर आजूबाजूच्या  नागरिकांनी आणि भक्तांनी नदीकाठावर मोठी गर्दी केली. काहींनी तिथेच आरती आणि पूजापाठही सुरु केले. दरम्यान, कुणीतरी या प्रकाराची माहिती पोलीस स्टेशनला कळवली. बातमी समजताच पोलिसांनी (Police) तातडीनं घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतलं. जलसमाधीचा साक्षात्कार झारखंडमधील साहिबगंज भागात एका महिलेनं आपल्याला साक्षात्कार झाल्याचं सांगत गंगा नदीत प्रवेश केला. गंगामातेचे आपण भक्त असून मातेने आपल्याला 24 तासांच्या समाधीसाठी बोलावलं असल्याचं तिनं सांगितलं. ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी गंगाकिनारी गर्दी करायला सुरुवात केली. काही भक्तमंडळींनी या महिलेसाठी नदीकिनारी प्रार्थना सुरु केली आणि पूजाअर्जादेखील सुरु केल्या. नदीकिनारी गर्दी वाढायला सुरुवात झाली. तेवढ्यात काही नागरिकांनी पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली. पोलिसांनी घेतले ताब्यात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंगेच्या पात्रात उतरू पाहणाऱ्या या महिलेला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला  आणलं. मात्र पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करणं उपस्थित जनतेला पटलं नाही. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊ नये, असा सल्ला अनेक नागरिकांनी त्यांना दिला. काहीजणांनी तर पोलिसांना महिलेपर्यंत पोहोचण्यापासून अटकाव करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कुणाचीही पर्वा न करता महिलेला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. हे वाचा - 'हजारो लोकांसमोर झाला बलात्कार'; 2 महिन्यांनंतर पीडितेनं सांगितली ती भयानक घटना पोलिसांनी सांगितलं हे कारण सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी कमीजास्त होत असते. अनेकदा धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होते. शिवाय नागरिकांच्या जिवाचं रक्षण करणं ही पोलिसांची जबाबदारी असून कायदा सुव्यवस्था बिघडत असेल, तर कारवाई करण्याचं आपलं काम असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. या प्रकाराची सध्या साहिबगंज भागात जोरदार चर्चा रंगते आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Ganga river, Police

    पुढील बातम्या