जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / गांजाच्या नशेत झिंगाट परदेशी तरुणीने जीप चोरून घातला राडा, साताऱ्यातला VIDEO

गांजाच्या नशेत झिंगाट परदेशी तरुणीने जीप चोरून घातला राडा, साताऱ्यातला VIDEO

गांजाच्या नशेत झिंगाट परदेशी तरुणीने जीप चोरून घातला राडा, साताऱ्यातला VIDEO

जीप चोरी करून पळ काढत असताना तिने अनेक वाहनांना धडक दिली. अखेर पोलिसांनी या नशेबाज तरुणीला अटक केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

सातारा, 07 डिसेंबर : सातारा (satara) जिल्ह्यातील कराड चिपळूण रोडवर नशेत झिंगाट झालेल्या एका परदेशी तरुणीने (Foreign girl) तुफान राडा घातला. एक जीप चोरी करून पळ काढत असताना तिने अनेक वाहनांना धडक दिली. अखेर पोलिसांनी या नशेबाज तरुणीला अटक केली. घडलेली हकीकत अशी की,  पावलीन कोरनेलिया जिसजे (Pauline Cornelia) असं या परदेशी तरुणीचे नाव आहे. ती नेदरलॅंडची रहिवाशी आहे. रविवारी दुपारी पावलीनने नशेत धुंद झाल्यानंतर एक महिंद्राची जीप चोरली होती. जीप चोरल्यानंतर नशेत तर्र असताना तिने रस्त्यावर बेफामपणे गाडी चालवली. रस्त्यात येईल, त्या वाहनाला ओव्हरटेक करत तर कुठे वाहनांना धडका देत ती पुढे जात होती. चोरी केलेली महिद्रा जीप पळवून घेऊन जात तिने कराडच्या दिशेने पोबारा केला.

जाहिरात

भरधाव वेगाने जीप चालवत अनेक वाहनांना जोरात कट मारत वाहनाचे नुकसान केले आहे. हा सर्व प्रकार तरुणीने चरस किंवा गांजा या अंमली पदार्थाच्या नशेत केला असल्याच सांगितले जात आहे. रस्तावर सुसाट वेगात गाडी पळवत असल्याचे पाहून स्थानिकांची एकच भंबेरी उडाली. काही तरुणांनी बाईकवर पाठलाग करून या तरुणीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, तिने काही गाडी थांबवली नाही. VIDEO : भीषण अपघातात गर्भवती महिलेचं पोट फुटलं अन् जिवंत बाहेर आलं अर्भक त्यानंतर प्रत्यक्षदर्शी लोकांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने कराड रस्त्याकडे धाव घेतली आणि  परदेशी तरुणीचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि कराडच्या  कृषी महाविद्यालय येथे एका मारुती सुझुकी कारला धडक दिल्याने जीप पलटी झाली. जीप पलटी झाल्यामुळे अखेर ही तरुणी पोलिसांच्या हाती लागली. तब्बल अर्धातास हा थरार सुरू होता. नशेबाज तरुणीला अटक झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. FD वर 6.85 टक्के व्याजासह मिळतील चांगले रिर्टन्स, मोठ्या गुंतवणूकीचीही गरज नाही पावलीनला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याविरोधात कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आज सोनवारी या पावलीनला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: satara
  • First Published :
जाहिरात
जाहिरात