नवी दिल्ली, 6 डिसेंबर : देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात. काळानं घाला घातला पण अर्भक वाचलं अशी एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रस्ते अपघातात एका गर्भवती महिलेचा अपघात झाला. या अपघातात महिलेचं पोट फुटलं आणि जिवंत अर्भक बाहेर आलं. या अर्भकाला रेस्क्यू करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र काळानं आईला नेलं आणि मुलाला वाचवलं असा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार महिला ब्राझीलच्या साओ पाउलो आणि कुरीटिबा या मार्गावरून ट्रकमधून जात होती. दरम्यान, ट्रक चालकाचे संतुलन बिघडल्याने ट्रक उलटला आणि अपघात झाला. ती महिला केबिनमध्ये बसली होती. अपघातामुळे ती ट्रकमधील लाकडाच्या खाली पडली. ही महिला तिच्या गर्भधारणेच्या 39 व्या आठवड्यात होती आणि दबावमुळे तिचे पोट फुटले.
हे वाचा- दीपिका पादुकोणने PHOTO मधून जाहीर केलं नव्या सिनेमाचं नाव? पोटात फुटल्यामुळे तिच्या गर्भाशयात असलेली मुलगी काही मीटर अंतरावर पडली. काठ्यांमुळे बाळाची नाळही कापली गेली. पोलिसांनी लाकूड हटवले तेव्हा त्यांना त्या महिलेचा मृतदेह सापडला. रस्त्याच्या कडेला मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. जेव्हा तिने तेथे जाऊन पाहिले तेव्हा नवजात मुलगी रडत होती. पोलिसांनी या अर्भकाला तातडीनं रेस्क्यू करून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. इतक्या मोठ्या दुर्घटनेत गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतरही तिची बाळ वाचलं हे पाहून रुग्णालयाचे डॉक्टर आणि इतर कर्मचारी आश्चर्यचकित झाले. या अपघातातून वाचलेल्या मुलीचे नाव जिओवन्ना असं ठेवण्यात आलं आहे.