भिवंडी, 29 ऑगस्ट : मुंबई जवळील भिवंडी (bhivandi) तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेवर पाशवी बलात्कार (gangrape) करून धमकविण्याची घटना समो आली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून नारपोली पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे येथे राहणारी अल्पवयीन पीडित मुलीच्या ओळखीच्या तिघा जणांनी आपसात संगनमत केलं आणि तिला काल्हेर येथील दुर्गेश पार्क सोसायटी मधील एक इमारतीच्या फ्लॅटवर आणलं. त्यानंतर पीडितेचे हात बांधून जबरदस्तीने तिघांनी आळीपाळीने जबरी शारीरिक अत्याचार केले. त्यास पीडितेनं विरोध केल्याने तिघा आरोपींनी पीडितेस मारहाण करीत तिचा शारीरिक छळ केला आणि झालेला प्रकार कोणाला न सांगण्याबाबत धमकावले. या बाबत पीडित मुलीने आपल्या सोबत घडलेला पाशवी अत्याचार कुटुंबियांना सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेल्या प्रकारामुळे त्यांना मोठा धक्का बसला.त्यांनी पीडितेस धीर दिला आणि तातडीने ठाणे येथील चितळसर पोलीस ठाणे गाठले. पीडितेनं झालेल्या घटनेबाबत तक्रार दिली. त्यानंतर सदर गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात वर्ग केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने जलद गतीने पावले उचलली. (पत्नीचा एकतर्फी प्रियकर जीवावर उठला, मुंबईच्या खार सबवेवर थरार, निरापराध पतीसोबत हे काय घडलं?) पोलिसांनी आकाश राजुप्रसाद कनोजिया (वय 22, धर्मवीरनगर,ठाणे) साहील प्रमाद मिश्रा (वय 21) आणि सचिन सुभाष कांबळे (वय 35 दोघे रा.हजुरीदर्गा वागळे इस्टेट, ठाणे) यांच्या मुसक्या आवळत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी नारपोली पोलिसांनी या तिघा आरोपींविरोधात बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सायंकाळी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.