जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मित्रांमध्ये लागली पैज! 10 मिनिटात 3 क्वार्टर दारू; पुढच्याच क्षणी अघटित घडलं!

मित्रांमध्ये लागली पैज! 10 मिनिटात 3 क्वार्टर दारू; पुढच्याच क्षणी अघटित घडलं!

मित्रांमध्ये लागली पैज! 10 मिनिटात 3 क्वार्टर दारू; पुढच्याच क्षणी अघटित घडलं!

कठीण प्रसंगी साथ देतो तोच खरा मित्र, मात्र येथे मैत्रीचा क्रूर चेहरा पाहायला मिळाला.

  • -MIN READ Trending Desk Uttar Pradesh
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : दारू पिण्याची पैज लावून ती जिंकण्याच्या नादात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात ताजगंज येथे ही घटना घडलीय. जयसिंग असं मयताचं नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी भोला व केशव या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण हे माहिती असूनही दारू पिणं, हे कदाचित खूप मूर्खपणाचं लक्षण म्हणावं लागेल. असाच एक प्रकार समोर आलाय. मित्रमंडळीमध्ये दारू पिण्याची पैज लावल्यानं आणि अति दारू प्यायल्यानं एका युवकाचा मृत्यू झालाय. जयसिंग असे मृत्यू युवकाचं नावं आहे. विशेष म्हणजे, जयसिंगचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासोबत असणाऱ्या भोला व केशव या दोघांनी त्याच्या खिशातील 60 हजार रुपयेही काढून घेतले, व हे पैसे आपापसात वाटून घेतले. मात्र, जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला, तेव्हा ताजगंज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी बहादूर सिंह यांनी दोघांना चौकशीसाठी बोलावलं, व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात केली. अवघ्या 11 दिवसांच्या बाळाचा जन्मदात्या बापानेच घोटला गळा; धक्कादायक कारण समोर काय होती पैज? उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील ताजगंज येथे तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भोला, केशव व जयसिंग या तीन मित्रांमध्ये पैज लागली की, 10 मिनिटांत 3 क्वॉर्टर दारू कोण पहिल्यांदा पिऊ शकतो? पण यानंतर असं काही घडलं, ज्याचा कोणी अंदाजही लावला नसेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयसिंग, केशव आणि भोला या तिघांनीही पैज लावली की, जो कोणी 10 मिनिटांत तीन क्वॉर्टर पिऊ शकेल, त्याला दारूसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. पण ही अट पूर्ण करताना अति दारू प्यायल्यामुळे जयसिंगचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर जयसिंगला रुग्णालयात नेण्याऐवजी भोला व केशव यांनी त्याच्या खिशातील 60 हजार रुपये काढून घेतले. तसेच ही घटना कोणालाही कळणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही घटना पोलिसांपर्यंत पोहचली, व त्यांनी तात्काळ भोला व केशव यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनीही घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी दोघांची रवानगी कोठडीत केली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत असून, या मधून अजून कोणकोणत्या गोष्टी समोर येतात, हे लवकरच कळेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात