नवी मुंबई, 10 फेब्रुवारी : लॉकडाउनच्या (Lockdown) काळामध्ये आपल्या मैत्रिणीसोबत जवळीक साधली म्हणून एका 19 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना नवी मुंबईत (Navi mumbai) उघडकीस आली आहे. या प्रकरणी नाशिकमधून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तळवली भागात राहणाऱ्या 19 वर्षीय अनिल शिंदे हा गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी अनिलला आलेल्या शेवटच्या फोन कॉलची माहिती तपासली आणि त्यानंतर नाशिकमधून 19 वर्षीय अनिकेत जाधव या तरुणाला अटक केली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनिलची हत्या केली असल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून घणसोली गावालगत असलेल्या परिसरातून अनिलचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. संतापजनक! धारधार शस्त्राने कुत्र्याची केली हत्या, पोलिसांकडून गुन्हा दाखल अनिकेत हा पूर्वी नवी मुंबईतील तळवली परिसरात राहत होता. त्यावेळी त्याची ओळख एका तरुणीशी झाली होती. पण लॉकडाउनमध्ये तो नाशिकला गेला होता. याच दरम्यान अनिलने या तरुणीशी मैत्री केली. दोघांमध्ये जवळीक वाढत चालली होती. ही बाब अनिकेतला कळाली. त्यामुळे त्याच्या रागाचा पारावारा उरला नाही. त्याला दोघांची जवळीक अजिबात आवडली नाही. त्यामुळे त्याने अनिल शिंदेंची हत्या करण्याचा कट रचला. घणसोलीमध्ये अनिलला बोलवून दारू पाजली आणि नंतर कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर अनिलचा मृतदेह हा घणसोली परिसरात फेकून दिला होता. UP: मारहाण करत पोलिसाची हत्या, 12 तासांच्या आत पोलिसांनी असा घेतला ‘बदला’ या प्रकरणात अनिकेतला एका अल्पवयीन मुलाने मदत केली होती. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असून बालसुधारगृहात पाठवले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.