बिहार, 26 जून : बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात पोलीस आणि आरोग्य विभागाच्या टीमने रक्ताचा काळात बाजार करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी दारूड्यांचं रक्त काढून खासगी रुग्णालये आणि गरजवंतानां सप्लाय करीत होते. दारूड्यांचं रक्त चढवल्यामुळे त्या रुग्णाच्या जीवाशी खेळ केला जात होता. ही टोळी रक्ताच्या बदल्यात दारूड्यांना स्मॅक देत होती.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कप्तानपाडा भागात गेल्या एक वर्षांपूर्वी राजकुमार मंडल नावाच्या तरुणाने घर खरेदी केलं होतं. या घरात ते रक्ताचा काळा बाजार करीत होते. स्थानिक महिलांनी सांगितलं की, दररोज येथे 10 ते 12 दारूडे आणि रिक्षा चालक रक्त देण्यासाठी येत होते. राजकुमार हे रक्त सप्लाय करीत होता. ज्यांच्याकडून रक्त घेतलं जात होतं, त्यांना पैसे किंवा स्मॅक दिलं जात होतं.
आरोपीच्या घरातून 37 यूनिट अवैध्य रक्त जप्त
जवळच राहणाऱ्या एका महिलेने सांगितलं की, 24 जून रोजी त्यांचा मुलगा सन्नीदेखील येथे आला होता. राजकुमारने त्याचं रक्त घेतलं होतं. यानंतर सनीला नीट चालताही येत नव्हतं. मात्र तेव्हापासून तो बेपत्ता आहे. सन्नीलाही स्मॅकचं व्यसन लागलं होतं. त्यामुळेच तो आपलं रक्त देण्यासाठी आला होता. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना सूचना देताच त्यांना छापेमारी करीत राजकुमारला अटक केली आहे. त्याच्या घरातून 37 यूनिट अवैध रक्त जप्त करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा-ब्युटी पार्लरच्या आड सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; अशी ठरवायचे तरुणींची किंमतसिव्हील सर्जनची टीम करून केली कारवाई
सिव्हील सर्जन डॉ. एसके वर्मा यांनी सांगितलं की, त्यांना रक्ताच्या काळा धंद्याबाबत माहिती मिळताच त्यांनी तीन सदस्यीय टीमचं गठण केलं. पोलिसांसोबत जाऊन त्यांनी छापेमारी केली आणि राजकुमारला ताब्यात घेतलं. दुसरीकडे हनुमानबागमधील संजीव साह यालाही अटक करण्यात आली असून दोघांवर प्राथमिक तक्रार दाखल करीत त्यांना तुरुंगात पाठविण्यात आलं आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.