नागपूर, 02 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. देशाला हादरवून टाकणाऱ्या मुंबईतील साकीनाका बलात्कार (Sakinaka rape case) प्रकरणानंतर, डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार (Dombivli Gangrape) केल्याची घटना उघडकीस आली. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या या दोन घटना ताज्या असताना, राज्याच्या उपराजधानीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील तीन महिलांनी एका अल्पवयीन मुलीच्या कौमार्याचा 40 हजारांत सौदा केल्याचा (minor girls virginity deal for 40 thousand) धक्कादायक प्रकार घडला आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तीन महिलांना जेरबंद केलं आहे. अर्चना शेखर वैशंपायन (रा. खरबी), रंजना चतुर्भज मेश्राम (गोधनी) आणि कविता पुरुषोत्तम निखारे (बांगलादेश, नाईक तलाव) अशी अटक केलेल्या महिलांची नावं आहे. या टोळीची मुख्य सूत्रधार अर्चना वैशंपायन असून तिने आपल्या मैत्रिणीच्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला वाढदिवसाला जायचं असल्याचं सांगत पीडितेला आपल्यासोबत नेलं.
हेही वाचा-तरुणीनं 15 व्या मजल्यावरुन उडी मारत संपवलं जीवन, CCTV कॅमेऱ्यात कैद झाला फोटो
यानंतर आरोपी महिलेनं पीडितेला फूस लावून शरीरविक्री करण्यास राजी केलं. यानंतर आरोपी पीडितेला रंजनाच्या घरी घेऊन गेली. याठिकाणी अन्य आरोपी कविता पीडितेसाठी ग्राहक शोधू लागली. 11 वर्षीय मुलीचं कौमार्य विकायचं असल्याचं सांगत आरोपी कविताने आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक आंबटशौकीन ग्राहकांशी संपर्क साधला. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बनावट ग्राहक बनून आरोपी महिलेशी संपर्क साधला.
हेही वाचा-आरोपीच्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; पुण्यात PSIकडून 25 वर्षीय युवतीवर रेप
40 हजार रुपयांत अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कौमार्याचा सौदा ठरल्यानंतर, बनावट ग्राहक आरोपी रंजनाच्या घरी गेला. याठिकाणी आरोपी महिलांनी 40 हजार रुपये घेतल्यानंतर पीडित मुलीला बनावट ग्राहकाच्या हवाली केलं. याचवेळी सापळा रचून बसलेल्या पोलीस पथकाने याठिकाणी छापा टाकला आणि तीन महिलांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nagpur