मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Facebook वरील मित्राला घरातली माहिती सांगितली, अन् मुंबईतील महिलेसोबत घडलं भयानक

Facebook वरील मित्राला घरातली माहिती सांगितली, अन् मुंबईतील महिलेसोबत घडलं भयानक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

फेसबुक वरील मित्राने लाखोंचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मीरा रोड (मुंबई), 12 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याचे फेसबुकवरील मित्राला सांगितल्यावर त्यानेच एका महिलेला लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

अलका पाटील (52) या महिलेची फेसबुक फ्रेंडने आर्थिक फसवणूक केली. मदतीच्या बहाण्याने त्या कथित मित्राने अलका यांना आठ लाखांना गंडा घातला. याप्रकरणी शुक्रवारी नवघर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला.

अलका पाटील या भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्टमध्ये राहतात. त्यांचे पती चंद्रकांत हे गेल्या वर्षी अभिनय विद्या मंदिरमधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. पतीच्या निवृत्ति वेतनावर घर चालत असल्याने मुलांच्या शिक्षणाकरिता जास्त पैसे खर्च होत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीबाबत अलका यांनी त्यांचे फेसबुकवरील अनोळखी मित्र डॉ. रायन रोलांड नावाच्या व्यक्तीला सांगितली.

यानंतर त्या अनोळखी मित्राने आर्थिक मदतीकरिता अलका यांच्याकडे बँक खात्याची माहिती मागितली. तसेच त्याने बँक ऑफ लंडनमधून अलका यांच्या खात्यात ८० हजार पौंड ट्रान्सफर झाल्याचा फोटोही व्हॉट्सॲपवर पाठवला. मात्र, नंतर अलका यांना फोन करून परदेशातून पैसे पाठवले असल्याने प्रोसेसिंग शुल्क म्हणून पैसे भरावे लागतील, असे सांगितले.

त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अल्का यांनी 80 हजार पौंड मिळणार म्हणून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम, तसेच त्यांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले आणि त्या अनोळखी व्यक्तीच्या विविध खात्यात पैसे भरले. याप्रकारे अलका यांच्याकडून त्याने ऑनलाईन तब्बल आठ लाख नऊ हजार रुपये उकळले. मात्र, यानंतर तुम्ही परदेशातून बेकायदा पैसे ट्रान्सफर करत असल्यानी माहिती पोलिसांना देऊ अन्यथा साडेसहा लाख रुपये द्या, अशी धमकी अलका यांना मिळाली.

हेही वाचा - दीड वर्ष प्रेमसंबंध, धर्मावरुन तरुणीचा लग्नाला नकार, त्यानं रागाच्या भरात थुंकी चाटायला लावली

त्यामुळे आपली फसगत झाली आहे, असे लक्षात येताच अलका पाटील यांनी नवघर पोलिसात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी नवघर पोलिसांनी डॉ. रायनसह मिसेस निर्मला श्रीवास्तव व आणखी दोघा मोबाइल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक फसवणुकीच्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास करत आहे. पण नागरिकांनी समाज माध्यमांवर आपली माहिती देऊ नये, असे आवाहनही पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Facebook, Financial fraud, Money fraud, Mumbai, Online fraud