जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / दीड वर्ष प्रेमसंबंध, धर्मावरुन तरुणीचा लग्नाला नकार, त्यानं रागाच्या भरात थुंकी चाटायला लावली

दीड वर्ष प्रेमसंबंध, धर्मावरुन तरुणीचा लग्नाला नकार, त्यानं रागाच्या भरात थुंकी चाटायला लावली

दीड वर्ष प्रेमसंबंध, धर्मावरुन तरुणीचा लग्नाला नकार, त्यानं रागाच्या भरात थुंकी चाटायला लावली

दिड वर्षांपासून प्रेमसंबंध असताना तरुणीने लग्नाला नकार दिला. यानंतर रागाच्या भरात प्रियकराने धक्कादायक कृत्य केले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लिव्ह इन रिलेशन, अनैतिक संबंधातून हत्या तसेच आत्महत्येही प्रकार उघडकीस आहेत. इतकेच नव्हे तर प्रेमसंबंधातूनही गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. यातच आता मुंबईत एक धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. दिड वर्षांपासून प्रेमसंबंध असताना तरुणाचा धर्म वेगळा म्हणून लग्नाला प्रेयसीने नकार दिल्यावर प्रियकराने रागात आपल्या प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य केले. प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीचे खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण, लैंगिक अत्याचार केला तसेच थुंकी चाटायला लावली, अशी तक्रार तरुणीने दिल्यावर काशिमीरा पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. इम्तियाज चौधरी असे या प्रियकर तरुणाचे नाव आहे. तो मीरारोड येथील रहिवासी आहे. इम्तियाज हा प्रेयसीला भेटण्यासाठी प्रयत्न करत होता. मध्यंतरी कोलकाता येथे गेलेला इम्तियाज जानेवारी महिन्यात परत आला होता. त्याने तरुणीला काशीमीरा भागातील लॉजमध्ये भेटण्यास बोलावले असता तिने नकार दिला. तसेच त्याने तिची खासगी छायाचित्रे आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेली तरुणी त्याला भेटण्यासाठी 29 जानेवारी रोजी काशीमीरा येथील लॉजमध्ये आली. हेही वाचा -  संसारासाठी नवरा सौदी अरेबियात, बायको प्रियकरासोबत सापडली आक्षेपार्ह अवस्थेत लॉजमध्ये त्याने तिला धमकावून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर त्याने थुंकलेली थुंकी तिला जबरदस्तीने चाटायला लावली. तसेच याबाबत कुठे वाच्यता केली तर मारण्याची धमकी दिली, अशी स्वरूपाची तक्रार त्या तरुणीने पोलिसात दिली आहे. पोलिसांनी बुधवारी इम्तियाज विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणात लॉजच्या कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल आदींची पडताळणी करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात