जयपूर, 10 डिसेंबर : लॉकडाऊनमुळे सर्वत्र शिक्षण हे ऑनलाइनचं सुरू आहे. अद्यापही सर्वच ठिकाणी शाळा सुरू झालेल्या नाहीत. मात्र परिणामी मुलं अधिकवेळ मोबाइल वापरू लागले आहे. अनेकांना तर याचं व्यसनही लागलं आहे. भविष्यात या सवयीतून अनेक धोके उद्भवू शकतात. राजस्थानमधून अशीच एक घटना समोर आली आहे.
नागौरमधील लाडनू पोलीस ठाणे हद्दातील एका गावातील 12 वर्षीय मुलाला ऑनलाइन मोबाइल (Online Game) गेम 'पबजी' आणि 'फ्री फायर' (PubG and Free Fire) चं अस्सं व्यसन लागलं की, तो घरातून थेट पळूनच गेला. हा अल्पवयीन मुलगा दोन दिवसांपूर्वी आपल्या आईचा फोन घेऊन फरार झाला होता. सुरुवातील कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र तरीही तो सापडला नाही.
शेवटी गुरुवारी त्यांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार केली. कुटुंबीय मुलाला सतत गेम खेळण्यास नकार देत होते. असंही त्यांनी यावेळी सांगितलं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा मोबाइलमध्ये तासन् तास पबजी आणि फ्री फायर गेम खेळत असे. ते त्याला गेम खेळण्यावरुन ओरडत असे. पबजी बॅन झाल्यानंतरही तो दुसरे ऑनलाइन गेम खेळत होता. अनेकदा तो आईचा फोन घेऊ गेम खेळत असे. (7th grader student addicted to Pubg and Free Fire online game took his mothers phone and fled)
हे ही वाचा-क्वार्टरमध्ये महिला सब इन्स्पेक्टरची आत्महत्या; स्वत:च्या बंदुकीनेच संपवलं जीवन
पोलिसांकडून तपास सुरू...
हा मुलगा 7 वीतील विद्यार्थी आहे. तो बुधवारी सकाळी 9 वाजता कोणालाही न सांगता आईचा फोन घेऊन पळून गेला. त्याना सर्व ठिकाणी शोधलं, मात्र तो कुठेच सापडला नाही. सध्या पोलिसांकडून अल्पवयीन मुलाचा तपास सुरू आहे. सध्या भारतात पबजी बॅन आहे. मात्र या मुलाने मोबाइलचं VPN (वर्च्युअल प्राइवेट नेटवर्क) चेंज करून पबजीचं इंटरनॅशनल वर्जन डाउनलोड केलं होतं. सोबतच त्याला फ्री फायर गेम खेळण्याचंही व्यसन लागलं होतं. दिवसभर तो दोन्ही गेम खेळत असे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.