जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / फार्मासिस्टने दिलेल्या 'त्या' औषधाने घेतला 64 वर्षांच्या व्यक्तीचा जीव; मुंबईतील घटना

फार्मासिस्टने दिलेल्या 'त्या' औषधाने घेतला 64 वर्षांच्या व्यक्तीचा जीव; मुंबईतील घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मृताने 15 दिवस अजाणतेपणे फार्मासिस्टने दिलेलं औषध घेतलं होतं, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. फार्मासिस्टने अँटिडिप्रेसंट असल्याचं समजून चुकीचं औषध विकल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 02 मार्च : चुकीच्या औषधांमुळे एका 64 वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना फार्मासिस्टने दिलेल्या चुकीच्या औषधांमुळे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर कुटुंबियांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. मुंबईतील परळ येथील 64 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर भोईवाडा पोलिसांनी मंगळवारी फार्मासिस्टला अटक केली आहे. मृताने 15 दिवस अजाणतेपणे फार्मासिस्टने दिलेलं औषध घेतलं होतं, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. फार्मासिस्टने अँटिडिप्रेसंट असल्याचं समजून चुकीचं औषध विकल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी फार्मासिस्टची जामिनावर सुटका करण्यात आली, असं पोलिसांनी बुधवारी सांगितलं. या संदर्भात ‘मिड डे’ ने वृत्त दिलंय. आपल्या 54 वर्षांच्या पत्नीसह परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या जनार्दन डोईफोडे यांचा चुकीची औषधं घेतल्याने शनिवारी मृत्यू झाला. डॉक्टरांनी मंगळवारी संध्याकाळी पत्नीला डिस्चार्ज दिला आणि कुटुंबीयांना तिच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. Mumbai Pollution: मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय, 5 वर्षातील आकडेवारी पाहून बसेल धक्का! Video “दुसऱ्याच्या चुकीमुळे मी माझा आधारस्तंभ गमावला आहे. तपास यंत्रणा आता चौकशी करेलही, पण माझ्या वडिलांना परत आणण्याचा त्यांच्याकडे काही मार्ग आहे का? आता या आघातासह मी कसा जगू?" असा सवाल मृत जनार्दन डोईफोडे यांचा मुलगा निनाद डोईफोडे यांनी विचारला. मंग्या गावडे हा 24 वर्षीय फार्मासिस्ट परळ येथील केईएम रुग्णालयासमोर असलेल्या भारतीय जेनेरिक औषधे या दुकानामध्ये काम करत होता. डोईफोडेंच्या पत्नी अँटिडिप्रेसेंट औषधं खरेदी करण्यासाठी तिथं गेल्या असता गावडेने त्यांना मेथॉट्रेक्झेट 7.5 हे औषध दिलं, जे संधिवात आणि सोरायसिसच्या उपचारात वापरलं जातं. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर असलेलं औषधाचं नाव आणि या औषधाचं नाव वेगळं असल्याचं डोईफोडेंच्या पत्नीने फार्मासिस्टच्या निदर्शनास आणून दिलं तेव्हा तो म्हणाला, मेथॉट्रेक्झेट 7.5 हे त्यांना हव्या असलेल्या अँटिडिप्रेसंट औषधाचं एक जेनेरिक व्हर्जन आहे आणि त्यातील ड्रग सारखंच आहे. बीड : बहिणीच्या लग्नानंतर बाप म्हणाला शाळेत जा, 7 वीच्या मुलानं विषयच संपवला एफआयआर दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी भारतीय जेनेरिक औषधे दुकानाला भेट दिली आणि मेथॉट्रेक्झेट 7.5 ची संपूर्ण बॅच आणि त्याची ऑर्डर आणि विक्री पावत्या जप्त केल्या. मेथॉट्रेक्झेट 7.5 नावाचं हे शेड्युल्ड ड्रग प्रिस्क्रिप्शनशिवाय विकलं जाणार नाही आणि दुकानात त्याच्या विक्रीची योग्य नोंद ठेवली आहे की नाही, याच्याकडे लक्ष देण्याचं काम एफडीए करेल. चुकीचं औषध दिल्याबद्दल भोईवाडा पोलिसांनी सुरुवातीला गावडेवर कलम 338 (गंभीर दुखापत करून जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणे) या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पण नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात