धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 1 मार्च : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या हवेतील प्रदुषणात सातत्यानं वाढ होत आहे. मुंबईतील सुनियोजित वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स हे प्रदुषणाचे हॉटस्पॉट बनल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यापाठोपाठ गोवंडी या शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांचं आयुष्यही प्रदुषणामुळे धोक्यात आलंय. प्रदूषणापासून सुटका व्हावी म्हणून नागरिकांनी आता एअर फिल्टरदेखील वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र एअर फिल्टर प्रत्येकाला परवडणारे नाही, त्यामुळे गोवंडीमधील गळा घोटणाऱ्या प्रदूषणावर सुटका व्हावी या मागणीसाठी गोवंडीकर आक्रमक झाले आहेत. गोवंडीला विळखा देवनार डम्पिंग ग्राउंड, एसएमएस कंपनी आणि सिमेंट मिक्सर प्रकल्प यामुळे दिवसेंदिवस गोवंडी परिसरात प्रदूषणाचा धोका वाढत आहे. या प्रकल्पांचा परिणाम इथल्या राहिवाशांवर झाला आहे. या परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेकांना श्वसनाच्या आजाराने ग्रासले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये श्वसनाच्या आजाराने मृत्यू झालेल्यांपैकी सर्वाधिक लोक हे फक्त गोवंडी मधील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून देवनार डम्पिंग ग्राउंडमधून पसरणारी दुर्गंधी, प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांनी इथल्या स्थानिक राहिवाशांना ग्रासलं आहे. त्यातच 2009 साली याच परिसरात रुग्णालयातील जैववैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रकल्प उभारला आहे. BKC बनले प्रदूषणाचे व्यावसायिक केंद्र, दुप्पट विषारी हवेने वाढवला त्रास धक्कादायक आकडेवारी वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांवर नेमके काय परिणाम झालेत? या प्रदूषणाने किती जणांचा मृत्यू झाला? याची आकडेवारी गोवंडीतील माहिती अधिकार कार्यकर्ते शेख फैयाज आलम यांनी मागितली होती. पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार प्रदुषणामुळे मागच्या पाच वर्षात तब्बल 6 हजार 757 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचं शेख यांनी सांगितलं. यामध्ये यात क्षयरोग, दम्याचे आजार, हृदयविकार अशा आजारांचा समावेश आहे. जे श्वसनामुळे आणि प्रदूषणामुळे होतात. चिंताजनक! नागपूरची हवा बनली घातक, ‘ही’ आहेत कारणं Video गोवंडीत प्रदुषणाचे प्रमाण रोज वाढत आहे. श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या इथं सर्वाधिक आहे. अनेकांनी आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये एअर प्युरिफायर बसवून घेतले आहेत. मात्र याची किंमत अधिक असल्यानं ते सर्वांना परवडत नाही.
गोवंडीमध्ये मजुरांची संख्या मोठी आहे. सरकारनं या भागात एअर प्युरिफायर यंत्र बसवावीत किंवा स्वस्त दरात उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.