बीड, 2 मार्च : राज्यामध्ये दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सातवीतील मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील शाळेला जा म्हणल्याचा राग मनात धरून त्याने आपले जीवन संपवले. बीडच्या वडवणी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली.
काय आहे संपूर्ण बातमी -
शिक्षणासाठी परत बीडला जा, असे म्हणाल्याचा राग मनात धरून सातवीत शिकणाऱ्या चिमुकल्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीडच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. प्रदीप अंगद साबळे (13) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
आईच्या मर्जीविरोधात मुलीने केलं Love Marriage, अन् अख्खं कुटुंबच संपलं
वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील अंगद साबळे यांच्या मोठ्या मुलीचा विवाह सात दिवसांपूर्वी झाला होता. बहिणीच्या विवाहासाठी भाऊ प्रदीप साबळे (13) हा बीडहून गावी आलेला होता. विवाहसोहळा पार पडल्यानंतर वडील अंगद साबळे यांनी प्रदीप याला तू बीडला शिक्षणासाठी जा, असे म्हणाले.
मात्र, तेव्हा प्रदीपने बीडला शिक्षणासाठी जाण्यास नकार दिला. त्यावर वडील बोलल्याचा राग मनात धरून शेतात गेलेल्या प्रदीपने पीक राखणीच्या माळ्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Death, School student