नालासोपारा, 27 नोव्हेंबर : मुंबई जवळील नालासोपारा शहरातील पश्चिमेकडील पाटणकर पार्क - परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा नकली पिस्तुल दाखवून अंदाजे 15 तोळे सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती घटनास्थळी पोहचून पंचनामा करत गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर सिग्नलच्या बाजूला असलेल्या शत्रूंजय बिल्डिंगमध्ये सुरेशकुमार धाकड (५८) यांच्या मालकीचे नेकलेस ज्वेलर्स नावाचे सोन्याचांदीचे दुकान आहे. शनिवारी दुपारी पावणे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान दुकान मालक एकटेच असताना दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपीने दुकानात प्रवेश केला. दुकान मालकाशी बोलणे सुरू केले आणि बहीण येत असल्याचे सांगून दागिने पाहू लागला. त्याचवेळी त्याने हातात असलेले पिस्तूल काढून त्यांना दाखवले.
(भुयार खोदून केली रेल्वे इंजिनची चोरी; लोखंड चोरांच्या सुळसुळाटामुळे पोलीस त्रस्त)
दरम्यान, दुकान मालकाने आरोपीला प्रतिकार केल्याने दोघांमध्ये 10 मिनिटे हाणामारी व झटापट झाली. तरीही आरोपीने अर्धा तास झालेल्या घटनेत अंदाजे साडे सहा लाखांचे 15 तोळे सोन्याचे दागिने लुटून पळून गेला आहे.
नेकलेस ज्वेलर्स या दुकानात दुपारच्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवून लूट केल्याचे सुरेशकुमार यांनी सांगितलं. या दुकानात या आधी २००१,२०१०,२०१८ साली चोरी झाली असताना सुद्धा या दुकानदाराने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले होते. विशेष म्हणजे, या दुकानातील सीसीटीव्ही बंद होते. पोलीस आता ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे ते तपासत आहे. ज्वेलर्स दुकान मालकांनी सीसीटीव्ही सुरू ठेवून कोणीतरी मदतनीस आणि दुकानाबाहेर सुरक्षा रक्षक ठेवावा. तसंच दुकानात सायरन ही ठेवावा. जेणेकरून अप्रिय घटना झाल्यावर सुरक्षेसाठी वाजवता येईल असे आवाहन नालासोपारा पोलिसांनी केले आहे.
(गर्दीच्या ठिकाणीच वडापाव विक्रेत्यांवर कोयत्यानं हल्ला, घटनेनं नाशिक हादरलं, Live Video)
या सीसीटीव्हीत १. ३९ ला अज्ञात आरोपी पाठीला पिशवी आणि हॅलमेट घेऊन आला त्यानंतर त्याने कॉईनची मागणी केली ते नाही सांगितल्यावर त्याने माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचे सांगून दागिने दाखवण्यास सांगितले. त्यानंतर मोका साधून त्याने १५ तोळे दागिन्यांची ट्ररे पिशवीत घालून झटापट करीत होता आवाज आल्याने परब चष्मा दुकानदार बाहेर आले आणि आरोपी व दुकानदाराला विचारले काय झाले मात्र दोघांनी काय झाले हे सांगितले नाही. त्यामुळे त्यांच्या समक्ष चोरटा निघून गेला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news