जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / सांगलीजवळ कृष्णा नदीत आढळला नग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह; घातपाताचा संशय

सांगलीजवळ कृष्णा नदीत आढळला नग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह; घातपाताचा संशय

सांगलीजवळ कृष्णा नदीत आढळला नग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह; घातपाताचा संशय

महाराष्ट्रातील सांगली शहरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीत (Krushna River) एका महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली, 26 मार्च: महाराष्ट्रातील सांगली शहरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीत (Krushna River) एका महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास काही लोकं कृष्णा नदीच्या स्वामी समर्थ घाटावर अंघोळीसाठी गेली होती. यावेळी त्यांना नदी पात्रात एका महिलाचा मृतदेह तरंगत असताना दिसला. या घटनेनंतर सुरुवातीला ज्यांनी हा मृतदेह पाहिला त्यांनी या प्रकाराची माहिती शहर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. दैनिक पुढारी ने दिलेल्या वृत्तानुसार, सांगली शहरातून वाहणाऱ्या कृष्णा नदी पात्रात एका महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह सापडला आहे. या महिलेचं वय साधारणतः 50 ते 55 च्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. हा मृतदेह स्वामी समर्थ घाट परिसरात आढळला आहे. तर संबंधित महिलेचे कपडे, पर्स आणि काही बाटल्या घाटावर आढळल्या आहेत. त्यामुळे संबंधित महिलेनं आत्महत्या केली की हा घातपात आहे, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. (हे वाचा- ‘DFO ला फाशी द्या’, महिला अधिकाऱ्याची सुसाइड नोट समोर आल्यानंतर आईची मागणी ) शुक्रवारी पहाटे काही लोकं कृष्णा नदीत स्वामी समर्थ घाटाजवळ आंघोळीसाठी गेले असता त्यांना धक्काच बसला आहे. ही लोकं नदी पात्रात आंघोळ करत असताना अचानक त्यांना एका  महिलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. संबंधित मृत महिलेच्या अंगावर काहीच कपडे नव्हते. अशा अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही प्रथमदर्शी लोकांनी यांची माहिती पोलिसांना दिली. (हे वाचा- बापरे! चक्क तरुणीनं प्रियकरावर केला अ‍ॅसिड हल्ला, घटनेत युवकाचा मृत्यू ) या महिलेची साडी आणि तिचे इतर कपडे घाटावरच आढळले आहेत. सोबतच एक पर्स आणि त्यामध्ये काही नाणी, एक डायरी आणि काही बाटल्या आढळल्या आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटली नाही. तसेच ही आत्महत्या आहे की घातपात हा संभ्रमही कायम आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात