जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बापरे! चक्क तरुणीनं प्रियकरावर केला अ‍ॅसिड हल्ला, घटनेत युवकाचा मृत्यू

बापरे! चक्क तरुणीनं प्रियकरावर केला अ‍ॅसिड हल्ला, घटनेत युवकाचा मृत्यू

बापरे! चक्क तरुणीनं प्रियकरावर केला अ‍ॅसिड हल्ला, घटनेत युवकाचा मृत्यू

एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात एका मुलीनंच आपल्या प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack on Lover) केला आहे. हल्ला करणारी मुलगी आणि मृत युवक हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-In Relationship) राहात होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 मार्च : मुलींवर अ‍ॅसिड हल्ला झाल्याच्या अनेक भयंकर घटना तुम्ही आजवर ऐकल्या असतील. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात एका मुलीनंच आपल्या प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack on Lover) केला आहे. ही घटना आग्रा जिल्ह्यातील हरीपर्वत परिसरातील आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्ला करणारी मुलगी आणि मृत युवक हे दोघंही प्रियकर प्रेयसी होते आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-In Relationship) राहात होते. मात्र, या तरुणाचं लग्न दुसऱ्याच मुलीसोबत ठरल्यानं नाराज तरुणीनं हे पाऊल उचललं असल्याचं समोर आलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, आरोपी प्रेयसी अद्यापही पोलिसांना सापडलेली नाही. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना हरीपर्वत ठाण्याच्या क्षेत्रात घडली आहे. लिव्ह इनमध्ये राहाणाऱ्या या कपलमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. यानंतर नाराज प्रेयसी सोनमनं झोपेत असलेल्या देवेंद्र या आपल्या प्रियकरावर अ‍ॅसिड ओतून त्याठिकाणाहून पळ काढला. निधनाआधी देवेंद्रनं सांगितलं, की जेव्हा मी घरी गेलो तेव्हा तिनं मला चहा बनवून दिला. यानंतर मी झोपी गेलो. याचवेळी तिनं माझ्यावर अ‍ॅसिड ओतलं आणि ती पळून गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत देवेंद्र हा कासगंज जिल्ह्यातील रहिवासी होती. तर, आरोपी प्रेयसी सोनमा औरैया येथील राहाणारी होती. देवेंद्र एका पॅथोलॉजीवर काम करायचा तर सोनम एका रुग्णालयात नर्स होती. हे दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्यात वाद झाले. यानंतर सोनमनं देवेंद्रवर अॅसिड हल्ला केला. उपचारासाठी देवेंद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपाचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात