महिलांना अश्लिल कॉल करणाऱ्या विकृताला अटक, बँकेत होता मोठ्या पदावर!

महिलांना अश्लिल कॉल करणाऱ्या विकृताला अटक, बँकेत होता मोठ्या पदावर!

आरोपी एरिकच्या विरोधात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. या विकृताने जवळपास 500 पेक्षा अधिक महिलांचा विनयभंग केला.

  • Share this:

मुंबई, 23 डिसेंबर : फिजिओ थेरपी (Physiotherapy) करण्याच्या बहाण्याने महिलांचे फोन नंबर घेऊन अश्लिल व्हिडीओ कॉल  करणाऱ्या विकृत नराधमाला नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai) अटक केली आहे. या विकृताने फिजिओथेरपिस्ट महिला डॉक्टराचा विनयभंग केला होता. धक्कादायक म्हणजे, या विकृताने आतापर्यंत 500 हुन जास्त महिलांचा विनयभंग केल्याचं समोर आले आहे.

एरिक अंकलेसरिया (वय 45 ) असं या विकृताचं नाव आहे. नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिटने या विकृताच्या मुसक्या आवळल्या. 45 वर्षीय एरिक हा बँकिंग क्षेत्रात मोठ्या पदावर काम करतो. नवी मुंबई पोलिसांनी त्याला माटुंगा परिसरातून अटक केली.

संजय लीला भंसाळी आणि आलिया भट्टविरोधात न्यायालयात खटला; वाचा काय आहे कारण

एका फिजिओथेरेपिस्ट महिला डॉक्टरने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. आरोपीने पीडित महिला डॉक्टरला व्हॉट्सअपवर अश्लिल मेसेज आणि व्हिडीओ कॉल केला होता. या महिलेनं जेव्हा ज्या नंबरवरून हा व्हिडीओ कॉल आला होता, त्या नंबरवर फोन केला असता तो बंद असल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी हा मोबाइल नंबर ट्र्र्रॅक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा नंबर भांडुप येथील एरिक अंकलेसरिया याचा असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवी उत्तर दिली. पण, पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने गुन्ह्याची कुबली दिली.

VIDEO प्रभुदेवाच्या गाण्यावर नाचताना चिमुरडीने फोडला TV,पाहा नेमकं काय झालं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एरिकच्या विरोधात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. या विकृताने जवळपास 500 पेक्षा अधिक महिलांचा विनयभंग केला.  तसंच आरोपी एरिकच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल आहे. पोलिसांनी विकृत एरिकला अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 23, 2020, 11:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या