**गडचिरोली, 16 नोव्हेंबर :**माओवाद्यांनी दंडकारण्यासह देशातल्या माओवादप्रभावीत भागात गेल्या पाच वर्षात पोलीस खबऱ्या ठरवून आतापर्यंत 409 नागरिकांची हत्या केल्याचा खळबळजनक दावा माओवाद्यांनी केला आहे. या संदर्भातलं एक बुकलेट जारी केले आहे. पीपल्स गुरील्ला आर्मी या माओवाद्याच्या सशस्त्र संघटनेच्या निर्मितीला 22 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी हे बुकलेट जारी केले आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे माओवाद्यांनी केले आहेत. ( Thane Crime : मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात गोळीबाराचा थरार; बैलगाडा शर्यतीच्या वादात दोन गटात फायरिंग Live Video ) गेल्या पाच वर्षात माओवाद्यांनी पोलीस खबऱ्याच्या आरोपाखाली तब्बल 409 नागरिकांची हत्या केल्याची बुकलेटमध्ये कबुली दिली आहे. तर दंडकारण्यात वेगवेगळया 1300 हल्ल्यात 429 जवानांच्या हत्येची तसेच 966 जवान जखमी झाल्याची कबुली माओवाद्यांनी दिली आहे. त्या दरम्यान जवानाकडील 85 अत्याधुनिक शस्त्रासह हजारो जिवंत काडतुसे माओवाद्यांनी पळवली आहेत. पाच वर्षात दोन आमदारांसह 40 लोकप्रतिनिधीची हत्या केल्याची कबुलीही या बुकलेटमध्ये माओवाद्यांनी दिली आहे. (व्हिडीओ व्हायरल झाला अन् पोलीस पोहोचले घरी, खोदकाम करताच सगळेच हादरले) उल्लेखनीय म्हणजे, गेल्या अकरा महिन्यात 132 माओवादी ठार झाले असून गेल्यावर्षीच्या मर्दीनटोलाच्या चकमकीत जहाल माओवादी मिलिंद तेलतुंबडेसह 27 माओवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याची घटना माओवादी संघटनेसाठी मोठा नुकसान असल्याच माओवाद्यांनी मान्य केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.