ठाणे 08 ऑक्टोबर : बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या एका महिला व्यवस्थापकाने केलेल्या फसवणुकीचं अजब प्रकरण समोर आलं आहे. या महिला व्यवस्थापकाने तिच्या इतर दोन साथीदारांसोबत मिळून एका पॉलिसीधारकाची 46 लाख रुपयांची फसवणूक केली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. नाशिकमध्ये इडली विक्रेत्याकडे पाच लाखाच्या बनावट नाटा! असा आणायचा चलनात उल्हासनगरचे हॉटेल व्यावसायिक आसन बालानी यांनी त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर काढलेल्या बजाज अलायन्स जीवन विमा पॉलिसीमध्ये लाखो रुपये जमा होते. रिलेशनशिप मॅनेजर, ब्रँच मॅनेजर आणि कर्मचारी यांनी बनावट सह्या करून जमा रक्कमेतून नवीन पॉलिसी तयार करत बालानी यांची फसवणूक केली. या प्रकरणी एका महिलेसह दोन जणांना अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण उल्हासनगरमध्ये उघडकीस आलं आहे. कॅम्पस मध्यवर्ती पोलीस स्टेशनने बजाज अलायन्स जीवन वीमा कंपनीच्या स्थानिक महिला व्यवस्थापक मिनू पंकज झा (वय ३२ वर्षे, रा. आसनगाव, शहापूर) हिला अटक केली. त्यानंतर पोलिसांना चौकशीत आढळून आलं की मीनूला बनावट कागदपत्र आणि हा सगळा कट रचण्यात आणखी दोघांनी मदत केली होती. मीनूने खुलासा केल्यानंतर या प्रकरणात विकास रामूप्रसाद गोंड, (वय 25, रा. पिसवली, कल्याण) आणि अनुज गुरुनाथ मढवी (वय 30, रा. घोडबंदर रोड, ठाणे) यांनाही पोलिसांनी अटक केली. ही फसवणूक समोर आल्यानंतर पोलिसांनी सर्वसामान्यान नागरिकांना आवाहन केलं, की दरवर्षी आपली विमा पॉलिसी तपासा. जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्या पॉलिसीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत की नाही. बुरखा घालायचा, पोलिसांना चकवायचा, ठाण्याच्या ICICI बँकेतील 12 कोटी लांबवणारा अखेर गजाआड बरेच लोक जीवन विम्याचा हप्ता वेळेवर भरतात. मात्र, ते याबाबतची इतर चौकशी करत नाही. याचाच गैरफायदा घेऊन अनेकदा मोठा घोटाळा केला जाण्याची शक्यता बळावते. अनेकांना तर आपली फसवणूक झाली आहे, हेदेखील कळत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहाणं आणि याबाबतची संपूर्ण माहिती घेणं अतिशय गरजेचं असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.