जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिकमध्ये इडली विक्रेत्याकडे पाच लाखाच्या बनावट नाटा! असा आणायचा चलनात

नाशिकमध्ये इडली विक्रेत्याकडे पाच लाखाच्या बनावट नाटा! असा आणायचा चलनात

नाशिकमध्ये इडली विक्रेत्याकडे पाच लाखाच्या बनावट नाटा! असा आणायचा चलनात

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या तामिळनाडूतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 7 ऑक्टोबर : बनावट नोटा व्यवहारातून संपवण्यासाठी सरकारने नोटाबंदी केली. मात्र, त्यानंतरही असे प्रकार समोर येत आहे. आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तब्बल 5 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत पोलिसांनी मोठी कारवाई केली. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या तामिळनाडूतील एका संशयीत व्यक्तीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ह्या नोटा या दोन-तीन नव्हे तर पाचशे रुपयाच्या 40 आणि दोन हजार रुपयांच्या 244 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून, या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मलायारसन मदतसमय (वय 33 ईस्टमार्ग, कायथर  पन्नीकार कुलुम  तुदुकुडी तामिळनाडू) असे या अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मोठी टोळी सक्रीय असण्याची शक्यता या व्यक्तीवर भारतीय चलनी नोटांची नक्कल करणे आणि त्या नोटा खऱ्या म्हणून वापरणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून एकूण 5 लाख 8 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा, 3 हजार तीनशे रुपये रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान ही कारवाई नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी केली आहे. बनावट नोटा तयार करून चलनात आणणारी मोठी टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय असून याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री भारतनगर परिसरातून पोलिसांनी या संशयित आरोपीला अटक केली आहे. वाचा - मुंबई विमानतळावर 100 कोटींचं ड्रग्ज, तस्कराची कल्पकता अधिकाऱ्यांनी ठेचली इडली व्यवसायिकाची कसून चौकशी सुरू बनावट नोटा प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यक्ती हा तामिळनाडूतील इडली व्यवसायिक असल्याची माहिती मिळाली असून तो आपल्याजवळ नकली नोटा खऱ्या असल्याचे म्हणून वापरत असल्याने व त्याच्या ताब्यात बनावट नोटा सापडल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत इडली व्यावसायिक असून त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने पोलिसांचा संशय अधिक वाढला आहे. त्यामुळे त्याच्या जवळ आणखी काही नोटा आहेत का? आणखी त्याचे कोणी साथीदार आहे का? या बनावट नोटा कुठे तयार करण्यात आल्या याचा सखोल तपास आता पोलिसांकडून चालू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात