भोपाळ 13 जून : एका विद्यार्थ्यानं स्टेटस ठेवून आत्महत्या (Student Committed Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कोणीही रडलं ना तर खरंच स्वप्नात येऊन भीती दाखवेल, असं स्टेटस (Whatsapp Status) ठेवून त्यानं स्वतःला गोळी मारली. त्यानं आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना रडण्यासाठी मनाई का केली, हे स्पष्ट झालेलं नाही. सोबतत त्यानं आत्महत्येसारखं पाऊल का उचललं, हे त्याच्या घरच्यांसह पोलिसांनाही समजू शकलेलं नाही. ही घटना मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) रीवामधील आहे. रीवामध्ये बीकॉमच्या या विद्यार्थ्यानं वडिलांच्या लायसन्ससी पिस्तुलानं स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. 21 वर्षीय विद्यार्थ्यानं मोबाईलवर सुसाईड नोट लिहून ती व्हॉट्सअॅप स्टेटसला लावली. यात लिहिलं होतं, की ‘कोणीही रडलं ना तर मी खरंच स्वप्नात येऊन भीती दाखवेल. मी माझ्या आई-वडिलांची मान सम्मानं उंचवण्याची स्वप्न पाहात होतो. मात्र, मी त्यांना मान खाली घालायला लावली. माझी काही चूक नाही आणि जे मे करत आहे, त्यात कोणाचाही हात नाही. प्रत्येकानं मला हसत निरोप द्या. कोणाला कधी काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा. पापाजी, तुमचं न रडण्याचं वचन मी पाहाणार आहे. कोणीही रडलं नाही पाहिजे.’ Iphone मधून लीक झाले न्यूड फोटो, Apple तरुणीला देणार करोडोंची भरपाई हे स्टेटस लावून त्यानं आत्महत्या केली आहे. मानवेन्द्र सिंहनं दुपारी आपल्या आई-वडिलांसोबत जेवण केलं आणि वडिलांना खाण्यासाठी फळ देऊन आपल्या रुममध्ये गेला. यानंतर त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. तात्काळ कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा मृत्यू झाला होता. माशाच्या तुकड्यावरुन वाद; जबर हाणामारीत 11 जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल रीवा सीएसपी सचिन्द्र प्रसाद यांनी सांगितलं, की पोलिसांनी आत्महत्येचं प्रकरण दाखल करत शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. कुटुंबीयांच्या मते, अभ्यासाच्या दबावामुळे त्यानं हे पाऊल उचललं आहे. मात्र, अद्याप आत्महत्येचं खरं कारण समोर आलेलं नाही. पोलिसांनी मते, अभ्यासामुळे हा विद्यार्थी मानसिक तणावात होता आणि कदाचित याच कारणामुळे त्यानं हे पाऊल उचललं आहे. मानवेन्द्र अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.