Home /News /crime /

माशाच्या तुकड्यावरुन वाद; जबर हाणामारीत 11 जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

माशाच्या तुकड्यावरुन वाद; जबर हाणामारीत 11 जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

गुरुवारी रात्री याठिकाणी माशाचं डोकं न मिळाल्यानं वाद सुरू झाला आणि हा वाद मारहाणीत बदलला. पाहता पाहता वराती आणि मुलीच्या घरच्यांमध्ये मारहाण (Fight Broke out Between Two Groups at Marriage Function ) सुरू झाली.

    पाटणा 13 जून : एका लग्नसमारंभात (Marriage Function) घडलेल्या घटनेनं सगळेच हैराण झाले आहेत. यात माशाच्या (Fish) आवडीच्या पीससाठी 11 लोकांमध्ये वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की ते एकमेकांना मारहाण करू लागले. यात 11 जण गंभीर जखमी झाले. हे प्रकरण बिहारच्या (Bihar) गोपालगंजमधील भोरे क्षेत्रातील भटवलिया गावातील आहे. गुरुवारी रात्री याठिकाणी माशाचं डोकं न मिळाल्यानं वाद सुरू झाला आणि हा वाद मारहाणीत बदलला. पाहता पाहता वराती आणि मुलीच्या घरच्यांमध्ये मारहाण (Fight Broke out Between Two Groups at Marriage Function ) सुरू झाली. दोन्ही बाजूचे 11 लोक यात जखमी झाले. यानंतर उपचापासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाही दाखल करुन घेतला आहे. पीडित सुदामा गोंड नावाच्या एक व्यक्तीनं असा आरोप केला, की त्यांचे नातेवाईक असलेल्या धन्नु गोंड यांच्याकडे मुलीची वरात आली होती. यात त्याच गावातील रहिवाशी असलेले हीरा गोंडदेखील आले होते. जेवण करताना त्यांनी जास्त पीस आणि माशाचं डोकं देण्याची मागणी केली. मात्र, हे आणण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे, हीरा गोंड यांनी मासे वाढणाऱ्या सुदामा गोंड याला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतक्यात काठी आणि लोखंडी रॉड घेऊन अजय गोंड, राजा गोंड यांच्यासह पाच लोक त्याठिकाणी आले आणि सुदामा गोंड, त्यांचा मुलगा मुन्ना गोंड आणि सून रीना देवी यांना मारहाण करू लागले. संतापजनक! आई 4 दिवस करत होती दारू पार्टी, बाळाचा भूकेनं तडफडून मृत्यू या घटनेत जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. तर, याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही 8 मे रोजी गोपालगंजच्या नरकटिया गावात चिकनसोबत लिट्टी न मिळाल्यानं गोळीबार करण्यात आला होता. या भयंकर घटनेत राजेंद्र सिंह नावाच्या एक व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bihar, Crime

    पुढील बातम्या