Home /News /crime /

2 पत्नी, 9 मुलं; Reels बनवण्यासाठी खास कॅमेरामॅन, मस्तीत जगणाऱ्या 'डॉन'चा असा झाला End

2 पत्नी, 9 मुलं; Reels बनवण्यासाठी खास कॅमेरामॅन, मस्तीत जगणाऱ्या 'डॉन'चा असा झाला End

देवा गुर्जर हा पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होता. त्याच्या खुनानंतर मोठा गोंधळ उडाला असून, त्याच्या समर्थकांनी निदर्शनं केली आहेत. गँगवॉरमध्ये मारल्या गेलेल्या या डॉन देवा गुर्जरचं पर्सनल आणि सोशल मीडिया लाइफही फार मनोरंजक होतं.

नवी दिल्ली, 6 एप्रिल : राजस्थानमधल्या रावतभाटा (Rawatbhata) इथल्या कोटा (Kota) बॅरियर डॅम रोडवरच्या बाजारात एका लोकल डॉनचा (Don) खून (Murder) करण्यात आला. देवा गुर्जर (Deva Gurjar) असं खून झालेल्या 40 वर्षीय तरुणाचं नाव असून तो बोराबास (कोटा) इथला रहिवासी होता. ही घटना सोमवारी (4 एप्रिल 2022) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत दोन वाहनांमधून आलेल्या 10 ते 15 जणांनी देवा गुर्जर याच्यावर भर दिवसा बंदूक, धारदार शस्त्रं, कुऱ्हाडी, रिव्हॉल्व्हरनं हल्ला केला होता. ही घटना परस्पर वैमनस्यातून (Animosity) घडल्याचं सांगितलं जात आहे. देवा गुर्जर हा पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होता. त्याच्या खुनानंतर मोठा गोंधळ उडाला असून, त्याच्या समर्थकांनी निदर्शनं केली आहेत. गँगवॉरमध्ये (Gang war) मारल्या गेलेल्या या डॉन देवा गुर्जरचं पर्सनल (Personal Life) आणि सोशल मीडिया (Social Media) लाइफही फार मनोरंजक होतं. त्यानं दोन लग्नं केली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तो नेहमीच सक्रिय होता. सोशल मीडियावर त्याचे जवळपास दोन लाख फॉलोअर्स (Followers) आहेत. आपल्या अकाउंटवर देवा, मारहाणीसह विविध स्टंटचे व्हिडिओ (Stunt Video) शेअर करत असे. त्याला एखाद्या डॉनसारखं आयुष्य जगण्याची विशेष आवड होती. दैनिक भास्करनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डॉन देवाकडे 50 पेक्षा जास्त जणांची टीम होती. त्याच्या नावानं सोशल मीडियावर एक फॅन पेजही (Fan Page) तयार करण्यात आलं होतं. एक कॅमेरामन (Cameraman) नेहमी देवासोबतच असे. या कॅमेऱ्यानं शूटिंग करूनच तो रील्स (Reels) तयार करत होत. कोटातल्या आरके पुरम पोलीस ठाण्यात (RK Puram Police Station) देवा गुर्जरवर अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दरोडा, खंडणी आणि मारहाण यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. चित्तौडगडमधल्या अनेक पोलीस ठाण्यांतही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. 2015 मध्ये देवा गुर्जरसह तिघांनी रावतभाटा हाट चौक मार्केटमध्ये भर दिवसा कैलास धाकड या तरुणाला काठ्यांनी मारहाण केली होती. मारहाण झालेला तरुण न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला होता. देवा आणि त्याच्या गुंडांनी केलेल्या बेदम मारहाणीत या तरुणाचे दोन्ही पाय अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. या हल्ल्याचा व्हिडिओ संपूर्ण रावतभाटात सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध खुनी हल्ल्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हे वाचा - बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येनं हादरलं नांदेड, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या डॉन देवाचं वैयक्तिक आयुष्यही फिल्मी होतं. त्यानं दोन लग्नं (Marriages) केली होती. या दोन बायकांपासून त्याला आठ मुली आणि एक मुलगा, अशी एकूण नऊ अपत्यं आहेत. कालीबाई आणि इंदिराबाई या त्याच्या दोन बायका एकाच घरात राहत होत्या. पहिल्या पत्नीपासून त्याला आठ मुली झाल्या होत्या. मुलगा नसल्यामुळे त्यानं दुसरं लग्न केलं होतं. देवा सोशल मीडियावर दोन्ही पत्नींसोबतचे व्हिडिओ आणि रील शेअर करत होता. देवाने अनेकदा दोघींसोबतचं शॉपिंग आणि करवा चौथ पूजेचे व्हिडिओही शेअर केले आहेत. देवानं आठ दिवसांपूर्वी आपल्या खुनाची शक्यता व्यक्त केली होती. याबाबत त्यानं आरकेपुरम पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीत देवा गुर्जरनं सांगितलं होतं, की तो रावतभाटा प्लांटमध्ये मजूर पुरवण्याचं (Labor Contractor) काम करतो. 23 मार्च रोजी 6 जणांनी त्याला मोबाइलवर फोन करून प्लांटमधलं कंत्राट न घेण्यास सांगितलं होत. त्यानं कंत्राट घेतलं तर त्याला जीवे मारण्याची धमकीही (Death Threats) मिळाली होती. या संभाषणाचं ऑडिओ रेकॉर्डिंग मोबाइल फोनमध्ये असल्याचं त्यानं सांगितलं होतं. देवाला धमकी देणाऱ्या आरोपींपैकी एकावर खुनाचा गुन्हाही सिद्ध झाला आहे. हा आरोपी देवाकडे पाच लाख रुपयांची मागणी करत होता. हल्लेखोर देवा गुर्जरचा मित्र असल्याचंही सांगितलं जात आहे. काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. या वादातून देवाचा खून झाल्याचं म्हटलं जात आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वीही देवा गुर्जरच्या मित्रानं देवाच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर 26 मार्च रोजी देवानं आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार कोटा इथल्या पोलीस ठाण्यात दिली होती. आपल्या वैयक्तिक आणि सोशल मीडिया लाइफमुळे प्रसिद्ध असलेल्या देवा गुर्जरचा खून झाल्यानं पंचक्रोशीमध्ये खळबळ उडाली आहे. त्याच्या समर्थकांनी निदर्शन करून जाळपोळ केली आहे.
First published:

Tags: Gang murder, Rajasthan

पुढील बातम्या