मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /घरी परतण्याच्या आनंदात दोघांचा विमानात दारू पिऊन गोंधळ; केलं असं कृत्य की मुंबईत उतरताच अटक

घरी परतण्याच्या आनंदात दोघांचा विमानात दारू पिऊन गोंधळ; केलं असं कृत्य की मुंबईत उतरताच अटक

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

मायदेशी परतल्याच्या आनंदात दोघांनी फ्लाइटमध्ये दारू प्यायली आणि हवेत फेकली. यानंतर त्यांनी तिथे उपस्थित प्रवासी आणि क्रू मेंबर्सशीही गैरवर्तन केलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 23 मार्च : दुबईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये दोघांनी दारू पिऊन गोंधळ घातला. त्यांनी विमानातील क्रू मेंबर्स आणि सहप्रवाशांना त्रास देत मोठा गोंधळ घातला. यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन्ही प्रवाशांना बुधवारी गोंधळ घालत शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

एअरलाइन स्टाफच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवणाऱ्या पोलिसांनी सांगितलं की, नालासोपारा येथील जॉन जी डिसोझा (४९) आणि कोल्हापुरातील मानबेट येथील दत्तात्रेय बापर्डेकर (४७) यांना अटक करण्यात आली आहे. घरी परतण्याचा आनंद साजरा करण्यासाठी दारूची अर्धी बाटली हवेत उडवली असल्याचं दोन्ही आरोपींनी पोलिसांना सांगितलं

सर्पदंश झालेल्या आईला वाचवण्यासाठी लेकीची धडपड; फिल्ममध्ये पाहिलं तसं सापाचं विष तोंडाने काढलं, शेवटी...

हे दोन्ही व्यक्ती एक वर्ष दुबईत काम करून भारतात परतत होते. मायदेशी परतल्याच्या आनंदात दोघांनी फ्लाइटमध्ये दारू प्यायली आणि हवेत फेकली. यानंतर त्यांनी तिथे उपस्थित प्रवासी आणि क्रू मेंबर्सशीही गैरवर्तन केलं. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहता, दोघांवर आयपीसी अंतर्गत इतरांचा जीव आणि सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल आणि संबंधित विमान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील या वर्षातील ही सातवी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने दुबईहून मुंबईला उड्डाण करताच दोघांनी ड्युटी फ्री शॉपमधून विकत घेतलेल्या बाटल्यांमध्ये मद्यपान सुरू केलं. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "शेजारी बसलेल्या प्रवाशांनी आक्षेप घेतल्यावर दोघे संतापले आणि त्यांना शिवीगाळ करू लागले."

एअरलाइनने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, बापर्डेकर उठले, शेवटच्या रांगेतील सीटवर गेले आणि स्टाफने इशारा दिला असतानाही मद्यपान सुरू ठेवलं, तर डिसोझा त्यांच्या सीटवरच मद्यपान करत राहिले. केबिन क्रू मेंबरने बाटल्या घेतल्यावर दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. क्रू मेंबरने याची माहिती कॅप्टनला दिली आणि विमान मुंबईत उतरताच दोघांना अटक करण्यात आली.

First published:
top videos

    Tags: Crime news, Domestic flight