मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शाळेत बेंचवर बसण्याच्या मुद्द्यावरून दोन भावांवर चाकू हल्ला, एकाचा मृत्यू

शाळेत बेंचवर बसण्याच्या मुद्द्यावरून दोन भावांवर चाकू हल्ला, एकाचा मृत्यू

शाळेतील वर्गात बेंचवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर (2 brother stabbed to death after quarrel over bench in the class) दोन भावांवर झालेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

शाळेतील वर्गात बेंचवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर (2 brother stabbed to death after quarrel over bench in the class) दोन भावांवर झालेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

शाळेतील वर्गात बेंचवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर (2 brother stabbed to death after quarrel over bench in the class) दोन भावांवर झालेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

चंदिगढ, 29 सप्टेंबर : शाळेतील वर्गात बेंचवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर (2 brother stabbed to death after quarrel over bench in the class) दोन भावांवर झालेल्या चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ गंभीर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू (Elder brother injured)  आहेत. बाकावर बसण्याच्या किरकोळ मुद्द्यावरून झालेल्या वादाचं पर्यावसान थेट खुनात झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

बेंचवर बसण्यावरून हाणामारी

हरियाणातील सोनिपत जिल्ह्यात बेंचवर बसण्याच्या मुद्द्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडणं झालं होती. सरकारी माध्यमिक शाळेतील दोघांमध्ये झालेल्या या भांडणानंतर एकाने दुसऱ्याचा बदला घेण्याचं ठरवलं. घटनेच्या काही दिवसांनंतर जेव्हा हा विद्यार्थी त्याच्या भावासोबत शाळेतून बाहेर पडत होता, तेव्हा पहिल्या विद्यार्थ्यासोबत आलेल्या काहीजणांनी त्याच्यावर चाकूचा हल्ला केला. सोबत असणाऱ्या भावाने या हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही या मुलांनी चाकूने भोसकले.

हल्ल्यात एकाचा मृत्यू

इमरान आणि समीर या भावांपैकी इमरानचं त्याच्या वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्यांशी भांडण झालं होतं. त्याचा राग मनात धरून 11 वीत शिकणाऱ्या इमरानवर हल्ला करण्यात आला. त्याचा बारावीत शिकणारा भाऊ समीरदेखील या घटनेत गंभीररित्या जखमी झाला. जखमी अवस्थेतील दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यातील इमरानला डॉक्टरांनी मृत घोषित केलं, तर जखमी समीरवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

हे वाचा -थरारक! या गावात पसरलीय ‘खुनी साधू’ची दहशत, उचललाय 9 जणांच्या हत्येचा विडा

पोलीस कारवाई सुरू

पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केले असून हे आरोपी अल्पवयीन आहेत. यातील सर्वजण सध्या फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच सर्वांना पकडलं जाईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी इमरानच्या कुटुंबीयांना दिलं आहे. मात्र बेंचवर बसल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या खुनाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Haryana, Murder