Home /News /crime /

Online Gaming : ऑनलाईन गेम खेळण्यातून वाद, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

Online Gaming : ऑनलाईन गेम खेळण्यातून वाद, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

23 मेला दोघे भाऊ आळीपाळीने मोबाईलवर गेम खेळत होते. त्याचवेळी 11 वर्षाच्या लहान भावाने मोठ्या भावाची पाळी आली तरी त्याला गेम खेळायला मोबाईल दिला नाही. यामुळे मोठ्या भावाने आपल्या लहान भावासोबत मारामारी सुरू केली.

  अहमदाबाद, 27 मे : विज्ञान (Science) हे जितके वरदान आहे, तितकेच ते जीवनासाठी शाप आहे, हे आपण सर्वांनीच लहानपणी वाचले होते. आज विज्ञानाने माणसाची आणि मुलांची विचार करण्याची क्षमता नष्ट केली आहे. या विज्ञानाच्या, ऑनलाईनच्या (Online) जमान्यात मुलांना मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन (Mobile Game Addiction) जडले आहे. मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम उपलब्ध आहेत. यामुळे गेमच्या व्यसनामुळे अनेक धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत. याचदरम्यात, आता गुजरात राज्यातील खेडा (Kheda Gujrat) जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काय आहे घटना - मोबाईलवर ऑनलाईन गेम (Online Game) खेळण्याच्या वादातून 16 वर्षीय मुलाने आपल्याच 11 वर्षाच्या लहान भावाचा खून (Brother Murder) केला. तसेच खून केल्यानंतर त्याचा मृतदेह हा विहिरीत फेकून दिला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ऑनलाइन गेम खेळण्यासाठी मोबाईल शेअर न केल्यामुळे दोन भावांमध्ये भांडण झाले. हा वाद इतका वाढला की मोठ्या भावाने लहान भावाचा खून केला. गोबलेज गावात सोमवारी ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी गुरुवारी या घटनेबाबत माहिती दिली. खेडा येथील पोलीस उपनिरीक्षक एसपी प्रजापती यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तसेच प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हे, कुटूंब शेजारच्या राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील आहे आणि गावाच्या बाहेरील परिसरात शेतमजूर म्हणून काम करण्यासाठी गोबलेज येथे आले होते. भावाचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकला -  23 मेला दोघे भाऊ आळीपाळीने मोबाईलवर गेम खेळत होते. त्याचवेळी 11 वर्षाच्या लहान भावाने मोठ्या भावाची गेम खेळण्याची वेळ आली तरी त्याला गेम खेळायला मोबाईल दिला नाही. यामुळे मोठ्या भावाने आपल्या लहान भावासोबत मारामारी सुरू केली. इतकेच नव्हे तर रागाच्या भरात मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात मोठ्या दगडाने वार केले. लहान भाऊ बेशुद्ध पडल्यावर किशोरने त्याचा मृतदेह वायरच्या सहाय्याने दगडाला बांधून विहिरीत फेकून दिला. त्यानंतर, त्याच्या आई-वडिलांना न सांगता, आरोपी अल्पवयीन बसमध्ये बसून राजस्थानमधील त्याच्या गावी निघून गेला. हेही वाचा - महिलेने पतीच्या प्रेयसीच्या मुलाची केली हत्या; न्यायालयाने सुनावली शिक्षा
  सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची दोन्ही मुले घरी आढळून आले नाही. यानंतर त्यांनी त्यांच्या गावी चौकशी करून मोठ्या मुलाबाबत विचारले. जेव्हा मोठ्या मुलाला परत आणण्यात आले. यावेळी त्याला लहान भावाबद्दल विचारल्यावर त्याने सांगितले की, भांडणानंतर त्याने आपल्या लहान भावाची हत्या केली होती, अशी माहिती पोलीस अधिकारी प्रजापती यांनी दिली. तर बुधवारी कुटुंबीयांकडून घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Game, Gujrat, Murder, Online

  पुढील बातम्या