Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

IT रेडमध्ये अत्तर व्यावसायिकाच्या घरात 150 कोटींची कॅश; कालपासून सुरू आहे नोटा मोजण्याचं काम

IT रेडमध्ये अत्तर व्यावसायिकाच्या घरात 150 कोटींची कॅश; कालपासून सुरू आहे नोटा मोजण्याचं काम

या व्यावसायिकाचे एका राजकीय नेत्यासोबत चांगले संबंध असल्याचेही उघड झाले आहे.

या व्यावसायिकाचे एका राजकीय नेत्यासोबत चांगले संबंध असल्याचेही उघड झाले आहे.

या व्यावसायिकाचे एका राजकीय नेत्यासोबत चांगले संबंध असल्याचेही उघड झाले आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

कानपूर, 24 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) कानपुरमध्ये अत्तर व्यावसायिक (Perfume Businessman) आणि सपा नेता (Samajwadi Leader) पीयूष जैनच्या घरात इनकम टॅक्सला 150 कोटी रुपयांहून रक्कम मिळाली आहे. गुरुवारी दुपारी इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या टीमने जैनच्या घरी रेड टाकली होती.

आनंदपुरी भागात पीयूष जैनच्या घरात मोठ मोठ्या कार्टन्स भरलेल्या नोटा सापडल्या. याचे काही फोटोदेखील समोर आले आहेत. विशेष म्हणजे पीयूष जैन अखिलेश यादवचे जवळचे आहेत आणि गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी अत्तर लॉन्च केलं होतं. (150 crore found in businessman house IT team found bundles of notes kept in shelves 4 machines fell short for counting)

याचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात पाहू शकता की, कपाटात कार्टन भरून नोटा ठेवल्या आहेत. 500 रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवले असून या पैशांची अशी रचना ठेवली होती की, सहजपणे कुरिअर करता येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, IT ची टीम नोटा मोजण्यासाठी 4 मशीन्स घेऊन पोहोचली होती. शुक्रवारी सकाळी एसबीआयच्या कल्याणपूर ब्रान्चमध्ये नोटा मोजण्यासाठी 2 मशीन्स बोलवण्यात आल्या. गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून येथे नोटा मोजण्याचं काम सुरू आहे. सांगितलं जात आहे की, त्यांच्या घरात 150 कोटींहून अधिक रोख असल्याची शक्यता आहे.

हे ही वाचा-डोअरबेल वाजवली,दार उघडताच नमस्कार करण्यासाठी वाकला खाली; काही सेकंदात खेळ खल्लास

नोटा मोजण्यासाठी SBI कर्मचारी बलवण्यात आले..

IT सूत्रांनी सांगितलं की, रक्कम इतकी मोठी होती की, रात्री उशिरापर्यंत 4 मशीन्सने 40 कोटी रुपयांपर्यंत मोजण्यात आले. बाकी नोटा आज मोजण्यात येतील. नोटा मोजण्यासाठी SBI च्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं आहे. त्यांच्या मदतीने नोटा मोजल्या जात आहेत.

अखिलेशच्या जवळचे आहेत पीयूष जैन..

व्यावसायिक पीयूष जैन सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पार्टीच्या नावावरुन अत्तर लॉन्च केलं होतं. यामुळे ते चर्चेत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष जैन यांच्या नावावर 40 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून टॅक्स चोरी केली गेली आहे.

First published:

Tags: Business, Crime, Samajvadi party, Uttar pradesh news