अमित राय, मुंबई 04 ऑक्टोबर : सातवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलीने शाळेच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी कांजूरमार्ग येथील एका शाळेत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थीनी मानसिक तणावात होती. यातूनच तिने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. सोमवारी सकाळी ती शाळेच्या इमारतीच्या छतावर गेली आणि तिथूनच उडी घेत तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. काहीतरी पडल्याचा आवाज येताच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. यानंतर जखमी अवस्थेतच या मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Dombivli Fire : पत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळलं; तिघींचाही मृत्यू, डोंबिवलीतील घटनेनं खळबळ समोर आलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थीनीच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं आणि ती सध्या तिच्या आईसोबत राहाते. वडिलांच्या निधनानंतर ती मानसिक तणावात होती. यातूनच आलेल्या नैराश्यातून तिने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सातवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलीने शाळेच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी कांजूरमार्ग येथील एका शाळेत घडली आहे
— News18Lokmat (@News18lokmat) October 4, 2022
बाईट: इक्बाल अवलकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) pic.twitter.com/5BdzWGIAyX
ही विद्यार्थीनी सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र काहीवेळाने नैसर्गिक विधीचं कारण देत ती वर्गातून बाहेर गेली आणि शाळेच्या छतावर उभा राहिली. यानंतर काही वेळाने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून तिने उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या कांजूरमार्ग पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचामागचं कारण शोधत आहेत. धक्कादायक! मुंबईतील शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; कानाचा पडदा फाटला मुंबईतील शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण दुसऱ्या एका घटनेत मुंबईतील एका शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यात एका शिक्षकाने विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीत नववीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला. क्लास सुरू असताना गोंधळ केल्याच्या संशयावरुन संस्कृतच्या शिक्षकाने या विद्यार्थ्याला कानशिलात लगावली असता ही घटना घडली.