मॉस्को, 12 जून : मुलासाठी प्रत्येक आई जीव द्यायला तयार असते. 25 वर्षांच्या आईने जे केलं ते वाचून तुम्हालाही तिचा संताप येईल.
मिरर या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार या महिलेला मित्रांसोबत दारु पार्टी (Liquor party) करायची होती. त्यामुळे तिने 11 महिन्याचा मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीला घरामध्ये कोंडून ठेवले. चार दिवस भुकेने व्याकूळ झाल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. तर मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात कोर्टाने महिला दोषी असल्याचा निर्णय दिला आहे.
रशियातील (Russia) ओल्गा बाजरोवा (Olga Baarova) असे या महिलेचे नाव आहे. ओल्गा तिच्या पतीपासून वेगळी राहते. मित्रांसोबत दारु पार्टी करण्यासाठी तिने तिच्या मुलांना मृत्यूच्या दरवाज्यात ढकलले. चार दिवस तिचे मुलं घरामध्ये बंद होते. या काळात मुलांची तिने काहीही चौकशी केली नाही.
ओल्गा पार्टी करुन घरी परतली तेव्हा तिच्या 11 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर मुलगी बेशुद्ध पडली होती. त्यानंतर तिने मुलांच्या आजीशी संपर्क साधला. आजीने घरी येताच नातीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि ओल्गाच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. या तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली.
स्थानिक कोर्टाने ओल्गाला अल्पवयीन मुलाची क्रुरतेनं हत्या करणे तसंच मुलीला धोकादायक अवस्थेत सोडून देत आईच्या कर्तव्याचे पालन करण्यास हलगर्जी केल्याचा आरोप ठेवला आहे. यावेळी ओल्गानं, मुलांना मारण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, तसंच या कृत्याचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचा युक्तिवाद केला.
पित्यानं 6 वर्षाच्या चिमुकलीला मारून 3 हजार फुट खाली लपवला मृतदेह, असा झाला खुलासा
कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळत ओल्गाला 14 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर तिचा पालकत्वाचा अधिकारही रद्द केला आहे. आता मुलीचा ताबा तिच्या आजीकडे देण्यात आला आहे. हा सर्व प्रकार घडला तेव्हा ओल्गाचा नवरा लियोनिद बाजरोव देखील जेलमध्ये होता, अशी माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.