नवी दिल्ली 23 जुलै : देशभरात कोरोनानं (Coronavirus in India) थैमान घातलेलं असतानाच कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण (Corona Vaccination) हे एक महत्त्वाचं शस्त्र मानलं जात आहे. अहमदाबादची औषध कंपनी 'झायडस कॅडिला' (Zydus Cadila) आपल्या ZyCov-D कोरोना लसीचा डेटा आज म्हणजेच शुक्रवारी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) सोपवेल. याबाबत एका सरकारी अधिकाऱ्यानं सीएनएन-न्यूज 18 ला माहिती दिली. औषध नियामकाने यापूर्वीही 'झायडस कॅडिला'ला ZyCov-D च्या रोगप्रतिकारक शक्ती आणि सुरक्षिततेशी संबंधित अधिक डेटा सादर करण्यास सांगितले होते, जी मानवी वापरासाठी जगातील पहिली प्लाझ्मिड डीएनए लस बनण्यासाठी तयार आहे.
भारतावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट, या 13 राज्यात वाढतोय धोका
सूत्रांनी सांगितलं, की डीसीजीआयची विषय तज्ज्ञ समिती (एसईसी) अतिरिक्त डेटाची तपासणी करेल आणि ती समाधानकारक आढळल्यास ऑगस्टमध्ये डीसीजीआयकडून अंतिम मंजुरी मिळू शकेल. यापूर्वी 'झायडस कॅडिला' नं म्हटलं होतं, की मंजुरी मिळाल्यानंतर दोन महिन्यांतच ते लस लॉन्च करू शकतात. फार्मास्युटिकल फर्मने 1 जुलै रोजी तीन डोसच्या डीएनए लसीसाठी आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी अर्ज केला.
कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट पोहोचला 124 देशांत, जगभरात चिंता वाढली
झायडसनं असा दावा केला आहे, की त्यांची लस लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर 66.6 टक्के प्रभावी आहे. तर, सामान्य किंवा कमी लक्षणं असणाऱ्यांवर 100 टक्के प्रभावी आहे. असंही म्हटलं जात आहे की ही लस 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठीही प्रभावी आहे. या लशीला मंजुरी मिळाल्यास ही भारतातील दुसरी स्वदेशी लस असेल आणि देशात वापरासाठी परवानगी मिळालेली पाचवी लस ठरेल. ZyCov-D लस 25 डिग्री सेल्सिअसवर तीन महिन्यांपर्यंत स्टोर करून ठेवता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine