नवी दिल्ली: देशभरात कोरोना रुग्णांची (Covid-19) आकडेवारी सातत्यानं वाढत आहे. त्यावेळी एक दिलासादायक बातमी (Good news) समोर आली आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगानं होत आहे, पण त्याचबरोबर रिकव्हरी रेट देखील वाढला आहे, असा दावा मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशी (Dr. Shashank Joshi, Mumbai) यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत ते 'मन की बात' (Man Ki Baat) कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यावेळी त्यांनी ही दिलासादायक माहिती दिली.
डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले की, " मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही रुग्णांच्या श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, ताप आणि वास घेता न येणे या तक्रारी येत आहेत. मात्र यापैकी 80 ते 90 टक्के लोकांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. यापैकी अनेक जण जास्तच घाबरलेले असतात."
"व्हायरस म्यूटेशन ही गंभीर समस्या असली तरी यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले. "आपण जसं कपडे बदलतो तसंच व्हायरस त्याचा रंग बदलतो. त्याला कंट्रोल केलं जाऊ शकतं आपण सतर्क राहण्याची गरज असून 14 ते 21 दिवस खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
अनेक जण हॉस्पिटलमधील उपचार उशीरा सुरु करतात. मोबाईलमधील अफवांवर विश्वास ठेवून ते आपला आजार आपोआप संपेल असा विचार करतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करणं आवश्यक असून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे," असं डॉ. जोशी यांनी स्पष्ट केलं.
पहिल्या Vaccine डोसनंतर झाला कोरोना; मग आता कधी घ्याल दुसरा डोस?
भारतामधील रिकव्हरी रेट अनेक मोठ्या देशांपेक्षा चांगला आहे. युरोप-अमेरिकेच्या तुलनेत आपल्या देशातील मेडिकल प्रोटोकॉलमुळे रुग्ण लवकर बरे होत आहेत. त्याचबरोबर लोक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंगचा वापर योग्य पद्धतीनं करत असल्याचा दावाही डॉ. जोशींनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus, Covid-19, PM narendra modi