जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / कोरोना पॉझिटीव्ह पत्नीच्या उपचारासाठी पतीनं केलं अ‍ॅम्बुलन्सचं अपहरण

कोरोना पॉझिटीव्ह पत्नीच्या उपचारासाठी पतीनं केलं अ‍ॅम्बुलन्सचं अपहरण

कोरोना पॉझिटीव्ह पत्नीच्या उपचारासाठी पतीनं केलं अ‍ॅम्बुलन्सचं अपहरण

सध्या देशभर गंभीर झालेली कोरोनाची (Covid 19) परिस्थिती सर्वांच्याच संयमाची परीक्षा पाहणारी आहे. या बिकट परिस्थितीमध्ये एका तरुणाचा संयम संपला.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 25 एप्रिल: आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी लोकं काहीही करायला तयार होतात. काहीही करण्याच्या मनस्थितीमधून अनेकदा त्यांच्या हातून गुन्हेगारी कृत्य देखील घडतं. सध्या देशभर गंभीर झालेली कोरोनाची (Covid 19) परिस्थिती सर्वांच्याच संयमाची परीक्षा पाहणारी आहे. या बिकट परिस्थितीमध्ये एका तरुणाचा संयम संपला आणि त्यानं कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती पत्नीच्या (pregnant wife) उपचारासाठी चक्क ऑक्सिजन असलेल्या अ‍ॅम्बुलन्सचं (ambulance) अपहरण केलं. (man hijacked ambulance) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) विदिशा जिल्ह्यातील ही घटना आहे. या जिल्ह्यातील पुतली घाट परिसरातल्या कुशवाह कुटुंबातील गर्भवती महिला 4 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आढळली. या महिलेच्या पतीनं ऑक्सिजनच्या सिलेंडरची व्यवस्था केली होती. मात्र तो हॉस्पिटलनं आपल्या पत्नीला उपचारासाठी दाखल करुन घ्यावं, अशी विनंती तो सतत करत होता. हॉस्पिटलमध्ये नवे पेशंट्स दाखल करण्याची क्षमता नाही हे त्याला माहिती होते. तरीही त्याच्या घरी 108 क्रमांकाची अ‍ॅम्बुलन्स आल्यानंतर त्यानं त्या अ‍ॅम्बुलन्सचं अपहरण केलं. हा प्रकार समजल्यानंतर दोन तासांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्या तरुणाला विनंती केली पण त्या अ‍ॅम्बुलन्समधून पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतरच पतीचं समाधान झालं. Oxygenचा तुटवडा होणार कमी, PM CARES फंडातून मोदी सरकार सुरू करणार 551 प्लांट यावेळी अपहरण केलेल्या तरुणानं अ‍ॅम्बुलन्सची काच फोडण्याची धमकी दिली होती, असा आरोप हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यानं केला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेचा पती शुक्रवारी रात्री 11 पासून अ‍ॅम्बुलन्स घरी पाठवावी अशी विनंती हॉस्पिटलकडं करत होता. त्या रात्री त्याच्याकडं अ‍ॅम्बुलन्स आली नाही. दुसऱ्या दिवशी 9.30 वाजता  अ‍ॅम्बुलन्स घरी पोहचली. त्यानंतर त्यानं अपहरणाचं टोकाचं पाऊल उचललं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात